ब्रेकिंग न्युज
पंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगतासोयाबीन उगवण क्षमता तपासूनच पेरणी करा – गेवराई कृषी विभागाकडून आवाहन.अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात; गावपुढारी बेफिकीर ; जबाबदार सरपंच ,ग्रामसेवकांवर कारवाई करा :- डॉ.गणेश ढवळेमाहिला शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने मुलींना स्वसंरक्षणाचे धडेथोरल्या पादुका मंदिरास भाविका कडून सव्वा लक्ष रूपयांची देणगीमराठा आरक्षणासाठी 32 वर्षांच्या तरुणाने गळफास घेऊन संपविले जीवन

पुन्हा बलात्काराने महाराष्ट्र हादरले, महाबळेश्वर येथे मुख्याध्यापकाकडून विद्यार्थिनीवर बलात्कार

महाबळेश्वर : राज्यात एकीकडे महिला दिन साजरा करत आहोत. मात्र दुसरीकडे अद्याप महिलांवर राज्यात होणारे अत्याचाऱ्यांच्या घटना काही कमी होण्याचे नाव घेत नाही. अशातच आता साताऱ्यातील महाबळेश्वर येथे एक धक्कादायक घटना घडल्याची माहिती समोर येत आहे.
शाळेतील मुख्याध्यापकानेच शाळेतील एका विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. साताऱ्यातील महाबळेश्वर या ठिकाणी ही घटना घडली. याप्रकरणी नराधम शिक्षकाला अटक करण्यात आली असून या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महाबळेश्वरमधील माखरिया नावाची हायस्कूल आहे. या हायस्कूलमध्ये एका शाळेच्या मुख्याध्यापकाने एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. दिलीप ढेबे असे संशयित आरोपीचे नाव आहे. आरोपी दिलीप ढेबे हा या शाळेचा मुख्याध्यापक आहे.

या मुख्याध्यापकाने शाळा बंद असल्याचा फायदा घेऊन शाळेत बलात्कार केल्याचे बोललं जात आहे. त्यामुळे महाबळेश्वर परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर महाबळेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार नोंद करण्यात आली आहे. यानंतर त्या आरोपीला नराधम शिक्षकाला अटक करण्यात आली आहे.

error: Content is protected !!