ब्रेकिंग न्युज
वाढदिवसाचे औचित्य साधत”महावीर के रोटी” उपक्रमांतर्गत अन्नदान स्मशानभूमी अभावी अंत्यसंस्कार करताना वाद ही लाजीरवाणी बाब मात्र लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला सोयरसुतक नाही:- डॉ.गणेश ढवळेसोयाबीन पेरणी पूर्वी उगवण क्षमता तपासा :- कृषी विभागाचे आवाहन.स्नेह-75 च्यावतीने जागतिक कुटूंब दिनानिमित्त शर्मा परिवाराचा सत्कारजामखेड कृषी उत्पन्न बाजारचे सभापती पै. शरद कार्ले यांच्या सभापती पदाची वर्षपुर्ती.घाटशीळ पारगावात व्यापाऱ्याला मारहाणटँकरने पाणी पुरवठाबाबत अडचणी आल्यास संपर्क क्रमांकावर तक्रार करावीजातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवजामखेड येथे मधूरजल प्युअर वाॅटर चे उद्घाटन संपन्नरणविर काका पंडीत यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

४५ चे ३६ कसे झाले हे कोडे आहे जिल्हा बॅंक ट्रेलर तर नगरपरिषद पिक्चर-खा.सुजय विखे.

४५ चे ३६ कसे झाले हे कोडे आहे
जिल्हा बॅंक ट्रेलर तर नगरपरिषद पिक्चर-खा.सुजय विखे.

🔸अशोक काळकुटे | संपादक

▪️धनराज पवार | जामखेड.
– जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत जामखेड बिनविरोध काढले तर कर्जतच्या निवडणुकीत त्यांनी ( आ. रोहीत पवार) ४५ ठराव असलेले घेऊन गेले पण मतमोजणीत ३६ कसे झाले हे कोडे त्यांना अजून उमजेना म्हणून जिल्हा बॅंक ट्रेलर आहे तर नगरपरिषदेचा पिक्चर दाखवयाचा आहे असा टोला खासदार सुजय विखे पा. यांनी आ. रोहीत पवार यांचे नाव न घेता लगावला. या कार्यक्रमाला आ. राम शिंदे उपस्थित नव्हते याबाबत वेगळीच चर्चा होती.
येथील केशर लॉन्समध्ये भाजप कार्यकर्त्यांचा स्नेह मेळावा व नवनिर्वाचित जिल्हा बॅंकेचे संचालक अमोल राळेभात यांचा सत्कार कार्यक्रमात खा. सुजय विखे पा. बोलत होते .

याप्रसंगी ज्येष्ठ नेते जिल्हा बँकेचे माजी संचालक जगन्नाथ राळेभात, विठ्ठलराव राऊत, भाजप तालुकाध्यक्ष अजय काशीद, युवक अध्यक्ष शरद कार्ले, शहराध्यक्ष बिभीषण धनवडे, प्रा. अरूण वराट, नगरसेवक अमित चिंतामणी, डॉ. ज्ञानेश्वर झेंडे, सुधीर राळेभात, रवींद्र सुरवसे, बापूराव ढवळे, सलीम बागवान, विनोद बेलेकर, सोमनाथ राळेभात, अँड. प्रवीण सानप, भरत काकडे, किसनराव ढवळे, मकरंद काशीद, पोपट राळेभात, तात्याराम पोकळे ,संचालक सागर सदाफुले, मनोज कुलकर्णी, प्रवीण शेठ चोरडिया , डॉ. अल्ताफ शेख, शिवकुमार डोंगरे ,प्रा संजय राऊत, प्रविण होळकर, मोहन देवकाते आदिंसह कार्यकर्ते उपस्थितीत होते.

यावेळी बोलताना खासदार विखे पा. म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ६० वर्षावरील नागरिकांना मोफत लस देत आहोत त्यासाठी कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा यासाठी प्रत्येकाने घरोघर जाऊन त्यांना लसीचे महत्त्व सांगून लसीकरण करण्यास कटीबध्द करा. राज्यातील जेवढे खासदार आहेत त्यांच्यापेक्षा जास्त निधी मी केंद्र सरकारकडून दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी आणला आहे पण प्रसिद्धी केली नाही परंतु येथील आमदार हा निधी मीच आणला असे सोशल मिडियावर सांगत आहेत जे काम आपण केले नाही त्याचे श्रेय घेऊ नये याबाबत मी जनतेत जाऊन निधी आणल्याचे सांगणार आहे. जिल्ह्यात ५० वर्षापासून विखे घराणे सामान्य कार्यकर्त्यांना न्याय देण्याचे व संघर्ष करण्यासाठी साथ देत आहे. जर विखे घराणे राजकीयदृष्टय़ा संपले तर सामान्य लोकांना न्याय मिळणार नाही असे खा. विखे म्हणाले.
तालुक्यात आ. रोहीत पवार हे दबावाचे व धाकटपशा दाखवून कसे राजकारण करीत आहे याची मला जाणीव आहे पण त्यासाठी त्यांना उत्तर देण्यासाठी निवडणूक होणे गरजेचे होते. जिल्हा बॅंकेच्या माध्यमातून आम्ही ते त्यांना दाखवून दिले आहे. त्यांनी मागील वर्षभरात एकही काम केले नाही माजी मंत्री राम शिंदे यांनी केलेल्या कामाचे उद्घाटन ते करीत आहेत. यापुढील काळात विखे गट हा भाजप म्हणून काम करील आपण सर्वजण भाजपचे कार्यकर्ते आहोत एकत्रितपणे काम करू असे खा. सुजय विखे म्हणाले.
यावेळी खासदार निधीतून जामखेड तालुक्याला दिलेल्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण सोहळा खा. सुजय विखे पा. यांच्या हस्ते झाले तसेच भाजप युवा मोर्चाच्या शहर पदाधिकारी यांना निवडीचे पत्र खा. विखे यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष अजय काशीद, जिल्हा सरचिटणीस रवींद्र सुरवसे, सुधीर राळेभात यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार अँड प्रवीण सानप यांनी केले आभार मनोज कुलकर्णी यांनी मानले.

error: Content is protected !!