ब्रेकिंग न्युज
वाढदिवसाचे औचित्य साधत”महावीर के रोटी” उपक्रमांतर्गत अन्नदान स्मशानभूमी अभावी अंत्यसंस्कार करताना वाद ही लाजीरवाणी बाब मात्र लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला सोयरसुतक नाही:- डॉ.गणेश ढवळेसोयाबीन पेरणी पूर्वी उगवण क्षमता तपासा :- कृषी विभागाचे आवाहन.स्नेह-75 च्यावतीने जागतिक कुटूंब दिनानिमित्त शर्मा परिवाराचा सत्कारजामखेड कृषी उत्पन्न बाजारचे सभापती पै. शरद कार्ले यांच्या सभापती पदाची वर्षपुर्ती.घाटशीळ पारगावात व्यापाऱ्याला मारहाणटँकरने पाणी पुरवठाबाबत अडचणी आल्यास संपर्क क्रमांकावर तक्रार करावीजातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवजामखेड येथे मधूरजल प्युअर वाॅटर चे उद्घाटन संपन्नरणविर काका पंडीत यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

आता संयम नाही,जगाला गुड बाय करण्याची वेळ आली ; सचिन वाझेंचे धक्कादायक व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस.

आता संयम नाही,जगाला गुड बाय करण्याची वेळ आली ; सचिन वाझेंचे धक्कादायक व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस.

🔸अशोक काळकुटे | संपादक

मुंबई-मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात वादाच्या भोवऱ्यात सापडलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांची बदली झाल्यानंतर त्यांचं व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस लक्ष वेधून घेत आहे. जगाला आता गुडबाय करायची वेळ जवळ आली आहे, असं सूचक स्टेटस वाझेंनी ठेवल्यामुळे खळबळ उडाली आहे. कालच वाझेंची नागरी सुविधा केंद्रात (सिटीझन फॅसिलिटेशन सेंटर) मध्ये बदली करण्याचे आदेश निघाले होते.

३ मार्च २००४ रोजी सीआयडीतील माझ्या सहकारी अधिकाऱ्यांनी मला खोट्या प्रकरणात अटक केली होती. ती केस अजूनही अनिर्णित आहे. मात्र आता पुन्हा इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे. माझे सहकारी अधिकारी आता पुन्हा मला चुकीच्या पद्धतीने गोवण्यासाठी सापळा रचत आहेत. तेव्हाच्या घटनेत आणि आताच्या घटनेत थोडा फरक आहे. त्यावेळी माझ्याकडे संयम, आशा, आयुष्य आणि सेवेची १७ वर्ष होती. आता मात्र माझ्याकडे ना आयुष्याची १७ वर्ष आहेत, ना सेवेची. ना जगण्याची आशा. जगाचा निरोप घेण्याची वेळ आता जवळ आली.” असं व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस सचिन वाझेंनी ठेवलं आहे.

सचिन वाझे यांची बदली

सचिन वाझे हे यापूर्वी मुंबई पोलिसातील गुप्तवार्ता विभागाचे प्रमुख होते. मात्र, मनसुख हिरेन प्रकरणामुळे आता त्यांना CFC विभागात टाकून साईडलाईन केल्याचे स्पष्ट दिसत आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना गुप्तवार्ता विभागाच्या प्रमुख पदावरुन हटवल्याची घोषणा करण्यात आली होती. तेव्हापासून सचिन वाझे यांची बदली आता कोणत्या विभागात होणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या.

सचिन वाझेंची ATS कडून १० तास चौकशी.

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणामुळं चर्चेत आलेल्या सचिन वाझे यांची दहशतवाद विरोधी पथक (ATS) ने तब्बल दहा तास चौकशी केली. मी ती स्कॉर्पिओ वापरली नाही, माझा धनंजय गावडेंना ओळखतही नाही, अशी माहिती सचिन वाझेंनी एटीएसला दिली. महाराष्ट्र एटीएस मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाची चौकशी करत आहे. या प्रकरणी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचे नाव चांगलेच चर्चेत आले आहे. यानंतर सचिन वाझेंनी ATS ने दहा तास चौकशी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून वाझेंवर अनेक आरोप होत होते. या आरोपानंतर वाझे स्वत: हून ATS च्या समोर गेले होते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

सचिन वाझे यांचा पाठलाग होत असल्याचा दावा
सचिन वाझे यांनी त्यांच्या गाडीचा एक गाडी पाठलाग करत असून त्याचा नंबर बनावट आहे, असा दावा केलाय. गाडीमध्ये पोलिसांचा बोर्ड लावून गाडीचा पाठलाग होतोय, असं वाझे म्हणाले. वाझे यांचा पाठलाग करणारी गाडी एटीएसची असल्याची सूत्रांची माहिती आहे. पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी दावा केल्याप्रमाणे MH 45 7W 4887 ही गाडी त्यांच्या गाडीचा पाठलाग करतेय. मात्र, या गाडीचा नंबर हा बोगस असल्याचं एपीआय सचिन वाझे यांनी म्हटलं आहे.

error: Content is protected !!