ब्रेकिंग न्युज
महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना वादळाचा बसणार तडाखा; ताशी 40 KM वेगाने वाहणार वारेलोकशाहीचा उत्सव साजरा होत असतानाच पिंपरनई गावावर शोककळा; विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने विवाहितेचा मृत्यू:- डॉ.गणेश ढवळेसीमा सिंग यांनी आयोजित केला कार्यक्रम  ‘इनस्पायरिंग मदर्स ‘मेघश्रेय फाउंडेशनतर्फे विविध महिलांचा करण्यात आला गौरवलिंबागणेश सर्कल मध्ये  तुतारीच वाजणार ; सर्वसामान्य मतदार बजरंग बाप्पाच्या पाठीशी लिंबागणेश येथील फेव्हीस्टीक प्रकरणामुळे संवेदनशील मतदान केंद्राचा आयजी विरेंद् मिश्रा,एसपी नंदकुमार ठाकूर  यांच्याकडून आढावा जागतिक योग दिनानिमित्त योग महोत्सवआमदार प्रा राम शिंदे यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्कसत्तेची गुरमी आणि गैरवापर कसा केला जातो याच उत्तम उदाहरण म्हणजे मोदी सरकार – शरद पवार पंकजाताई मुंडेंच्या विजयावरशिक्का मोर्तब करा:पप्पू कागदेबुवा जय हरी ! पालखी सोहळ्याचे वेळापत्रक आलं बरं ,लागा तयारीला !

संजय राठोड गायब नाहीत-अजित पवार.

संजय राठोड गायब नाहीत-अजित पवार.

🔸अशोक काळकुटे | संपादक

संजय राठोड गायब नाहीत, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केल आहे. अजित पवार यांनी मुंबईत पत्रकारांशी संवाद साधला, यावेळी पत्रकारांनी पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी विचारले असता ते बोलत होते. पूजाच्या वडिलांनीही सांगितलं आहे. एकाला ताब्यात घेतलं आहे, अजून एक दोघांना ताब्यात घेतलं जात आहे. पोलीस काम करत आहेत. मोठ्या व्यक्तीचं नाव आलं की वेगळी प्रसिद्धी मिळत असते, पण आमचा अंदाज आहे, चौकशीनंतरच सत्य येईल, असंही अजित पवार यावेळी म्हणाले आहेत.

आताच्या घडीला ती व्यक्ती निराधार, अजितदादांकडून राठोडांची पाठराखण
आताच्या घडीला ती व्यक्ती निराधार आहे ही वस्तुस्थिती आहे. यापूर्वी धनंजय मुंडेंबाबतीत असंच घडलं, आरोप झाल्यावर राजीनामा घेतला असता तर त्यांची स्वत:ची बदनामी झाली असती. नंतर आरोप करणाऱ्या व्यक्तीने तक्रार मागे घेतली, असं म्हणत अजित पवार यांनी संजय राठोड यांची पाठराखण केली आहे.

त्याबद्दल शिवसेनाच भूमिका घेईलः अजित पवार.

या प्रकरणात कुणाला पाठीशी घालण्याचा प्रश्न नाही. जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही, तोपर्यंत एखाद्याला दोषी धरायचं किंवा पदावरून हटवायचं हे कितपत योग्य आहे, हा विचार करण्याजोगा भाग आहे, असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलंय. अर्थात ते शिवसेनेचे नेते आहेत. त्याबद्दल शिवसेनाच भूमिका घेईल. माझं स्वत: एकचं त्रयस्त म्हणून मत आहे. जोपर्यंत चौकशीच्या बाबतीत अंतिम अहवाल येत नाही तोपर्यंत थोडसं पेशन्स ठेवा, असा सल्लाही अजित पवारांनी मीडियाला दिलाय.

जोपर्यंत चित्र स्पष्ट होत नाही, तोपर्यंत कोणावर आरोप करणे चुकीचेः अजित पवार.

मला असा माहिती मिळाली की ते गुरुवारी स्पष्टीकरण देतील. कोणावर असे आरोप झाले तर त्याची रितसर चौकशी झाली पाहिजे. जोपर्यंत चित्र स्पष्ट होत नाही, तोपर्यंत कोणावर आरोप करणे योग्य नाही, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी संजय राठोड प्रकरणावर दिलीय.

चौकशी झाल्यानंतर संपूर्ण चित्र स्पष्ट होईलः अजित पवार.

वास्तविक राजकीय क्षेत्रात अशा घटना घडतात तेव्हा चौकशी व्हावी. मुलीच्या वडिलांची देखील प्रतिक्रिया ऐकली आहे. त्या मुलीला पोल्ट्री व्यवसाय टाकायचा होता, असंही ऐकलं आहे. याबाबत पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं आहे, अजून तपास सुरू आहे. चौकशी झाल्यानंतर संपूर्ण चित्र स्पष्ट होईल. आताच्या घडीला ती व्यक्ती निराधार आहे हे चित्र स्पष्ट आहे. धनंजय मुंडेबाबत माहिती न घेता राजीनामा घेतला असता तर त्यांची बदनामी झाली असती, असंही अजित पवार म्हणालेत.

त्यांच्याबद्दल शिवसेनाच भूमिका घेईलः अजित पवार
ते शिवसेनेचे एक नेते आहेत त्याबाबत शिवसेना भूमिका घेईल. माझं मत आहे चौकशीच्या बाबतीत अंतिम अहवाल येत नाही, तोपर्यंत काही पावलं उचलणे चुकीचं आहे. कदाचित शिवसेनेच्या नेत्यांसोबत बोलले असतील. अशा वेळेस संपूर्ण मीडिया त्यावर बोलतेय, त्यामुळे पुढे येत नसतील. त्यांची चौकशी किती चालणार हे मला माहीत नाही. मी काही गृहमंत्री नाही. पुण्याला गेल्यावर पोलिसांना सांगेन पत्रकारांच्या प्रश्नाची उत्तर हवी आहेत, असंही अजित पवारांनी सांगितलंय.

तर आपल्याला त्याची मोठी किंमत चुकवावी लागेल-अजित पवार.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावरही अजित पवार यांनी नागरिकांना काळजी घेण्यास सांगितलंय. कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता याबाबत चर्चा झाली. पुढची पावले कशी टाकायची याबाबद्दल चर्चा झाली. कोरोना असताना काम देखील महत्त्वाचं आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड मेट्रोला मंजुरी दिली आहे, याबाबत केंद्राकडून निधी दिला जाणार आहे. हा प्रस्ताव केंद्राकडे जाईल. लोकांनी कोरोनाबाबत काळजी घेणे गरजेचे आहे, असंही अजित पवार म्हणालेत. लग्न असेल तर किती लोक असणे गरजेचे आहे ते नियम घातले आहेत ते पाळावे नियम मोडू नये. जे नियम बनवले आहेत त्यानुसार सर्वांनी वागावे. कोरोना आहेच नाही असे लोक वावरत आहेत. कोरोना वाढला तर आपल्याला त्याची मोठी किंमत चुकवावी लागेल. हा कोरोना महाराष्ट्रातून आणि देशातून कसा बाहेर जाईल हे प्रयत्न करावे लागतील, असेही अजित पवार म्हणाले आहेत.

error: Content is protected !!