ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

दुकानदार व्यापाऱ्यांना RTPCR Test करण्याचा अव्यवहारिक अन्यायकारी आदेश मागे घेण्यात यावा-डॉ. अनिल बोंडे.

दुकानदार व्यापाऱ्यांना RTPCR Test करण्याचा अव्यवहारिक अन्यायकारी आदेश मागे घेण्यात यावा-डॉ. अनिल बोंडे.

🔸अशोक काळकुटे | संपादक

अमरावती जिल्ह्यामध्ये सर्व व्यापाऱ्यांना व दुकाना मधील काम करणाऱ्या सर्व व्यक्तींना RTPCR Test करावी तरच दुकान उघड्त्या येईल असे अन्याय कारक आदेश काढण्यात आला आहे. वरील आदेश वैज्ञानिक व व्यवहारीक नसल्यामुळे तातडीने मागे घेण्यात यावा.

अगोदरच गेल्या वर्ष भरापासून कोरोनाचे लॉकडाऊन व विविध नियमामुळे अतोनात नुकसान झाले आहे. त्यांनी घेतलेले कर्जाची परत फेड करणे कठीण होते. भाडे, मुन्सीपल टक्स, इलेक्ट्रिक बिल, नोकरांचा पगार याचा न टाळण्यासारखा भुर्दंड आहेच. कोरोनाच्या नावाखाली सातत्याने बदलणारे नियम लावुन व्यापाऱ्यांची छळवणूक केली जात आहे. मोर्शी नगरपालिकेचे मुख्य अधिकारी तर हाताताईपणा करण्यात आघाडीवर आहे. या संकटाच्या परिस्थितीत २५-२५ हजार रु. दंड साध्या चहा विक्रेत्याला करण्यात आला. अशी मजल या अधिकाऱ्यांची झाली आहे. अशीच परिस्थिती थोड्या फार फरकाने असल्याने व्यापारी दुकानदार रोजगार निर्माण करणारे त्रस्त झाले आहे.

यामध्ये भरीस भर जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व व्यापारी व दुकानातील नोकरांचा RTPCR करण्यात यावा तोपर्यंत दुकाने बंद ठेवण्यात यावे असा विचित्र आदेश काढण्यात आला आहे. आज RTPCR निगेटिव्ह राहील याची तरी उद्या निगेटिव्हच राहील याची कोण खात्री देणार आहे. परंतु या आदेशामुळे व्यापारी दुकानदार नोकर वर्ग यांची मोर्शी तपासणी केंद्रावर झुंबड उडालेली आहे. मोर्शी येथे तपासणी केंद्रावर दर दिवशी फक्त १०० RTPCR केली जातात. त्यांचेही रिपोर्ट यायला चार दिवस लागतात. म्हणजे तेवढे दिवस RTPCR ची तपासणी व रिपोर्ट येईपर्यंत त्यांना दुकाने बंद ठेवावी लागणार आहे. १-१ आठवडा दुकान बंद ठेवून व्यापाऱ्यांचा, दुकानदारांचा, स्वयंरोजगार यांचे अतोनात हाल होणार आहे. त्यांना कोरोनासारखे किंवा सर्दी पड्साचे लक्षण असतील त्यांचे RTPCR test करणे संयुक्तिक आहे. तसेच कोरोना Positive आलेल्या रुग्णाच्या संपर्कात असलेल्या व्यक्तींची टेस्ट करणे हा उपाय आहे परंतु सरसकट व्यापाऱ्यांना टेस्ट करायला लावणे, तोपर्यंत दुकाने बंद ठेवायला लावणे अन्याय कारक, अवैज्ञानिक व अव्यवहारिक असल्यामुळे तातडीने हा आदेश मागे घेण्यात यावा. व कोरोनाबाबतीत सुरक्षित अंतर, मुखपट्टी (मास्क), हात धुणे, सनिटायझर ही नियमावली पूर्वी प्रमाणे लागू ठेवण्यात यावी.

error: Content is protected !!