ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

पालकमंत्री छगन भुजबळ यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या जनतेला दिला हा इशारा

पुन्हा एकदा कोरोनाने आपलं डोकं वर काढलं आहे. आज वाढत असलेली रुग्णसंख्या सरकारच्या अडचणी वाढवता दिसत आहे. त्यात राज्याच्या काही जिल्ह्यांमध्ये पुन्हा मिनी लॉकडाऊन जाहीर करण्याची वेळ आली आहे. त्यातच नाशिकमध्ये सुद्धा कोरोनाचा उद्रेक होताना दिसत आहे.

याच पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये वाढत असलेल्या कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी भाष्य केले आहे. सरकारने दिलेल्या सवलतींचा गैरफायदा घेतला जात आहे. कारवाई केली तर ती फार कठोर असेल. अनिश्चित काळासाठी दुकानं बंद करण्याची कारवाई होऊ शकते, असा इशारा भुजबळ यांनी नाशिकरांना दिला आहे.

“दुर्दैवाने कोरोनाची दुसली लाट आली हे नक्की आहे. नाशिकला १० हजार ८०० कोरोना रुग्ण आहेत. यंत्रणा कामाला लागलेली आहे. १५ मार्च रोजी पॉझिटिव्हिटीचा दर ४१ टक्के होता, आता तो ३२ टक्क्यांवर आहे. चाचण्यांचे प्रमाण वाढवले आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयात एका दिवसात ५ हजार स्वॅब तपासण्याची व्यवस्था केली आहे. रोज २० हजार तपासण्या होण्याची क्षमता आहे. पण लोक तिथपर्यंत गेले तरच उपयोग होणार आहे असे त्यांनी बोलून दाखविले होते.

error: Content is protected !!