ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

शिवसेना उप तालुकाप्रमुखाने प्रेयसीच्या घरी घेतला गळफास  

 

औरंगाबाद : राज्यात तसेच देशभरात आत्महत्येचे सत्र काही थांबायचे नाव घेत नाही. त्यात आता शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. मात्र आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

मिळालेल्या माहितीनुसार औरंगाबाद जिल्ह्यातील शिवसेनेच्या उप तालुका प्रमुख असलेले सुनिल खजिनदार याने आपल्या प्रेयसीच्या घरी गळफास घेऊन आपले जीवन संपवले आहे. तसेच सुनील हा दौलताबादमधील ग्रामपंचायत सदस्य देखील होता.

मात्र या सर्व घटनेवर त्यांच्या कुटुंबीयांनी संशय व्यक्त करत सखोल चौकशीची मागणी केली आहे. तसेच नातेवाईकांनी दौलताबाद पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या मांडला आहे. त्यामुळे याठिकाणी शेकडोंचा जमाव गोळा झाला होता. नातेवाईकांनी सुनिलची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. गुन्हा दाखल करण्याची मागणी सुनिलच्या नातेवाईकांकडून केली जात आहे. परिणामी परिसरात तणावपूर्ण शांततेचं वातावरण पाहायला मिळतं आहे.

error: Content is protected !!