ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

लग्नासाठी नकार दिल्याने बापाकडून मुलीची हत्या

सांगली : मुलगी विवाहास तयार होत नसल्याच्या कारणावरुन चिडलेल्या बापाने मुलीचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली. विशेष म्हणजे या घटनेनंतर मुलीच्या बापाने गुपचूप तिचा अंत्यविधीही उरकला. मात्र प्रेत अर्धवट जळाल्यामुळे ते पुन्हा दफन करण्यात आले. हा सर्व धक्कादायक प्रकार सांगलीतील आटपाडी या ठिकाणी घडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक केली आहे.

नेमकं काय घडलं?

सांगलीच्या आटपाडी येथे बनपुरी येथे पूर्वेला चौगुले वस्तीवर उत्तम चौगुले नावाचे गृहस्थ राहत होते. उत्तम चौगुले यांच्या मुलीच्या लग्नासाठी एक स्थळ आलं होते. पण या लग्नाला मुलीचा नकार होता. ती आता लग्न नको, असे वारंवार घरात सांगत होती. यावरुन शनिवारी 13 मार्चला वडील आणि मुलीमध्ये टोकाचा वाद झाला.

या वादातून तिच्या वडिलांनी त्या मुलीला बेडग्याने बेदम मारहाण केली. यावेळी डोक्‍यावर घाव बसल्यामुळे मुलगी रक्ताच्या थारोळ्यात पडली. तिचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर तिच्या वडिलांनी घरात स्वच्छता केली.

हृदयविकाराच्या झटक्‍याने मृत्यू झाल्याचा बनाव

त्यानंतर शेजाऱ्यांसमोर मुलीचा हृदयविकाराच्या झटक्‍याने मृत्यू झाल्याचा बनाव केला. यावेळी वस्तीवरची अनेक माणसे या ठिकाणी अंत्यविधीसाठी जमा झाली. त्यावेळी अनेकांना ही घटना संशयास्पद वाटली. त्यामुळे त्यांनी काढता पाय घेतला. विशेष म्हणजे त्या मुलीला पाहण्यासाठी येणाऱ्या मुलाच्या कुटुंबियांनाही त्यांनी याची माहिती दिली नाही.

गुपचूप अंत्यसंस्कारही उरकले

यानंतर आरोपी उत्तम चौगुले याने इतर चौघांना सोबत घेऊन घराशेजारीच असलेल्या ओढापात्राजवळ मध्यरात्री तिचा अंत्यविधी उरकला. मात्र तिचे प्रेत अर्धवट जळल्यामुळे त्याने ते ओढा पात्रातच दफन केले.

मात्र या घटनेनंतर गावात उलटसुलट चर्चा सुरु होती. आठ दिवसांनंतर हा सर्व प्रकार समोर आला. याप्रकरणी पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. त्यावेळी संशयित आरोपी उत्तम चौगुले याला ताब्यात घेण्यात आले. यानंतर पोलिसांनी पोलिसी हिसका दाखवताचा त्याने स्वत:च्या मुलीचा खून केल्याची कबूली दिली. यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

error: Content is protected !!