ब्रेकिंग न्युज
जागतिक योग दिनानिमित्त योग महोत्सवआमदार प्रा राम शिंदे यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्कसत्तेची गुरमी आणि गैरवापर कसा केला जातो याच उत्तम उदाहरण म्हणजे मोदी सरकार – शरद पवार पंकजाताई मुंडेंच्या विजयावरशिक्का मोर्तब करा:पप्पू कागदेबुवा जय हरी ! पालखी सोहळ्याचे वेळापत्रक आलं बरं ,लागा तयारीला !शेतीकामांसाठी बैलांची मागणी वाढल्याने भर दुष्काळात बैलबाजारात तेजीआज12 मे जागतिक परिचारिका दिनानिमित्तग्रामदैवत सालशिदबाबा यात्रा उत्सव उद्या दिनांक १२/०५/२०२४ वार रविवार यात्रेचे आयोजनआज कडा येथील उपमुख्यमंत्री अजित पवार व छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या जाहीर सभेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे.-आ. बाळासाहेब आजबे यांचे आवाहनजामखेड येथे महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी

लस घेतल्यानंतरही धनंजय मुंडे कोरोना पॉझिटिव्ह ; दुसऱ्यांदा मुंडेंना कोरोना ची लागण.

लस घेतल्यानंतरही धनंजय मुंडे कोरोना पॉझिटिव्ह ; दुसऱ्यांदा मुंडेंना कोरोना ची लागण.

🔸अशोक काळकुटे | संपादक

राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे या़ंना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. आज त्यांचा रिपोर्ट पुन्हा पॉझिटिव्ह आला आहे. यापूर्वी धनंजय मुंडे यांना कोरोना ची लागण झाली होती. त्यानंतर काही दिवस त्यांनी ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये उपचार घेतले होते. आणि कोरोनावर मात करून परतले होते.
विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपूर्वीच मंत्री धनंजय मुंडे यांनी कोरोना ची लस घेतली होती. यानंतर आज त्यांनी कोरोना चाचणी केल्यानंतर पॉझिटिव्ह आलेली आहे.
यासंदर्भात एक ट्विट करून स्वतः धनंजय मुंडे यांनी तशी माहिती दिली आहे. या ट्विटमध्ये..
“माझी आज दुसऱ्यांदा कोरोना चाचणी positive आली आहे.गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली तपासणी करून घ्यावी ही विनंती.मी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काळजी घेत आहे. काळजी करण्यासारखं काही नाही.सर्वांनी मास्क वापरावा,सोशल डिस्टन्सचे पालन करावे व स्वतःची काळजी घ्यावी.” असे त्यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.

error: Content is protected !!