ब्रेकिंग न्युज
लोकशाहीचा उत्सव साजरा होत असतानाच पिंपरनई गावावर शोककळा; विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने विवाहितेचा मृत्यू:- डॉ.गणेश ढवळेसीमा सिंग यांनी आयोजित केला कार्यक्रम  ‘इनस्पायरिंग मदर्स ‘मेघश्रेय फाउंडेशनतर्फे विविध महिलांचा करण्यात आला गौरवलिंबागणेश सर्कल मध्ये  तुतारीच वाजणार ; सर्वसामान्य मतदार बजरंग बाप्पाच्या पाठीशी लिंबागणेश येथील फेव्हीस्टीक प्रकरणामुळे संवेदनशील मतदान केंद्राचा आयजी विरेंद् मिश्रा,एसपी नंदकुमार ठाकूर  यांच्याकडून आढावा जागतिक योग दिनानिमित्त योग महोत्सवआमदार प्रा राम शिंदे यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्कसत्तेची गुरमी आणि गैरवापर कसा केला जातो याच उत्तम उदाहरण म्हणजे मोदी सरकार – शरद पवार पंकजाताई मुंडेंच्या विजयावरशिक्का मोर्तब करा:पप्पू कागदेबुवा जय हरी ! पालखी सोहळ्याचे वेळापत्रक आलं बरं ,लागा तयारीला !शेतीकामांसाठी बैलांची मागणी वाढल्याने भर दुष्काळात बैलबाजारात तेजी

अखेर उद्या रात्री १२ वाजल्यापासुन १० दिवस लॉक-डाऊन.

अखेर उद्या रात्री १२ वाजल्यापासुन १० दिवस लॉक-डाऊन.

🔸अशोक काळकुटे | संपादक

बीड– वाढते कोरोना रुग्ण पाहता बीड जिल्ह्यात उद्या म्हणजे २५ मार्च च्या रात्री बारा वाजेपासून ते ०४ एप्रिल पर्यंत जिल्हा संपूर्णपणे लॉक डाऊन असणार आहे. या काळात शासकीय कार्यालये वगळता इतर सर्व खाजगी कार्यालये, बांधकाम बंद राहतील. बाहेरच्या जिल्ह्यात जाण्यासाठी किंवा येण्यासाठी अँटिजेंन टेस्ट किंवा आर.टी.पी.सी.आर बंधनकारक असेल असे आदेश जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी दिले आहेत.
आज पार पडलेल्या पत्रकार परिषदेदरम्यान बोलताना या संदर्भातली जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी सविस्तर माहिती दिली आहे.

काय असेल बंद?

बीड जिल्ह्यातील स्टेडियम,जिम,स्विमिंग पूल,उपहारगृह,हॉटेल,रेस्टॉरंट, बार,बंद राहणार आहेत. शाळा महाविद्यालये,प्रशिक्षण संस्था बंद असतील. सार्वजनिक,खाजगी वाहने,दुचाकी,चारचाकी वाहने बंद असतील. सर्व प्रकारची बांधकामे,चित्रपट गृहे,व्यायामशाळा,नाट्यगृह बंद असतील. मंगल कार्यालये,हॉल,स्वागत समारंभ बंद असतील. सर्व धार्मिक स्थळे, सार्वजनिक प्रार्थनास्थळ बंद असतील. खाजगी कार्यालये बंद असतील. दुकानाचे शटर बंद करून आत क्लोजिंगची कामे तीन व्यक्तींना करण्यास परवानगी असेल.

काय असेल सुरू?

सर्व किराणा दुकानाची ठोक विक्रेते सकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत सुरू राहतील. किरकोळ विक्रेते यांनी सकाळी ७ ते ९ या वेळेत दुकानातून घरपोहच किराणा माल पुरवठा करतील. दूध विक्री सकाळी १० पर्यंत सुरू राहील. भाजीपाला व फळांची ठोक विक्री सकाळी ७ ते १० या वेळेत किरकोळ विक्रेत्यांना विक्री करतील. किरकोळ विक्रेते सकाळी ७ ते १२ या काळात गल्लोगल्ली फिरून विक्री करतील. खाजगी दवाखाने मेडिकल सुरू राहतील ऑनलाइन औषध वितरण दवाखान्याशी संलग्न असलेली दुकाने २४ तास सुरू ठेवता येतील. सर्व न्यायालये,राज्य केंद्र शासनाची कार्यालये ५० टक्के उपस्थिती मध्ये सुरू ठेवता येतील .

बीड शहरात पोलीस पेट्रोल पंप,साई पेट्रोल पंप हे फक्त दोनच पंप सुरू राहतील. येथे पोलीस,आरिजि व इतर शासकीय वाहने,अत्यावश्यक सेवेत कार्यरत असणारे कर्मचारी,घरगुती गॅस,पिण्याच्या पाण्याचे वितरण करणारी वाहने. दैनिक वर्तमानपत्र, नियतकालिके, डिजिटल प्रिंट मीडिया, शासकीय कार्यालये सुरू राहतील .अंत्यविधी साठी २० लोकांना परवानगी असेल. स्वास्य धान्य दुकाने १२ पर्यंत सुरू राहतील.

error: Content is protected !!