ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

दिपाली चव्हाण आत्महत्येला कारणीभूत ठरलेल्या आरोपींचे प्रतीकात्मक दहन

अमरावती : आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून दिपाली चव्हाण हिने सर्विस रिव्हॉल्व्हरने गोळी झाडून राहत्या घरी आत्महत्या केली होती. या प्रकरणी डीएफओ शिवकुमार आणि श्रीनिवास रेड्डी यांना अटक करण्यात आली होती. मात्र या घटनेमुळे राजकीय वातावरण सुद्धा चांगलेच तापू लागले होते.

त्यात आता दिपाली चव्हाण हिला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या डीएफओ शिवकुमार आणि श्रीनिवास रेड्डी या दोन्ही आरोपींच्या प्रतिमेचे दहन राणा दाम्पत्याने केले. खासदार, आमदार, गावकरी आणि वनरक्षक यांच्या उपस्थितीत दीपाली चव्हाण यांना श्रद्धांजली अर्पण केली.
दीपाली चव्हाण यांनी आत्महत्या केलेल्या हरीसाल येथील शासकीय निवासस्थानाला नवनीत राणा आणि रवी राणा यांनी भेट दिली.

घटनास्थळाची पाहणी करत ही दुर्दैवी घटना कशी घडली याची माहिती शेकडो आदिवासी बांधव आणि गावकऱ्यांच्या उपस्थितीत घेतली.
या गंभीर घटनेची सखोल चौकशी व्हावी आणि भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी खासदार म्हणून आपण संसदेत आणि आमदार रवी राणा विधानसभेत खंबीरपणे आवाज उचलणार असल्याचे, नवनीत राणांनी सांगितले. दोषींना फक्त कठोर शिक्षा नव्हे, तर फाशीच झाली पाहिजे, अशी मागणी करणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितले.

 

error: Content is protected !!