ब्रेकिंग न्युज
नर्सिंगच्या नवीन अभ्यासक्रमामुळे संधी वाढल्याकुणबी प्रमाणपत्र न मिळाल्याने पालवण येथील मराठा तरुणाची आत्महत्या ..!बिंदुसरा नदीपात्राशेजारील ३०० घरांना महापुराचा धोका ; मान्सुनपुर्व साफसफाईची जिल्हाधिका-यांना मागणी   :- डॉ.गणेश ढवळेआळंदी मंदिरात मोहिनी एकादशी साजरी मंदिरात लक्षवेधी पुष्पसजावट; दर्शनास गर्दीसांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभा

बीड जिल्ह्यात ३० एप्रिल पर्यंत कडक लॉक-डाऊन ; राज्य सरकारने ऐनवेळी लादले निर्बंध.

बीड जिल्ह्यात ३० एप्रिल पर्यंत कडक लॉक-डाऊन? ; राज्य सरकारने ऐनवेळी लादले निर्बंध.

🔸अशोक काळकुटे | संपादक

सर्व आदेश राज्य सरकारने दिलेले आम्ही फक्त मराठीत ट्रान्सलेट केले-जिल्हाधिकारी जगताप.

बीड- १६ मार्च ते ०४ एप्रिलपर्यंत जिल्ह्यात लॉक डाऊन लावल्यानंतर आता राज्य शासनाचा ३० एप्रिल पर्यंत लॉक डाऊन चा फतवा आल्याने जिल्हा प्रशासनाने त्याप्रमाणे आदेश काढत उद्यापासून मेडिकल, किराणा, भाजीपाला, न्यूज पेपर, वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

आज सायंकाळी ०७:०० वाजता नवे आदेश काढत प्रशासनाने शनिवार-रविवारी संपूर्ण लॉक डाऊन आणि सोमवार ते शुक्रवारी अत्यावश्यक सेवा ज्यामध्ये किराणा, मेडिकल, भाजीपाला,दूध वगळता इतर दुकाने संपूर्णपणे बंद राहतील,या काळात वैध कारणाशिवाय नागरिकांना बाहेर पडता येणार नाही. म्हणत प्रशासनाने सगळ्या छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांना धक्का दिला आहे.

जिल्हा प्रशासनाने राज्याचे आदेश कायम करत उद्यापासून अत्यावश्यक सेवा वगळता कोणालाही दुकाने उघडता येणार नाहीत असे आदेशात म्हटलं आहे.

या नव्या आदेशामुळे बीड सारख्या मागास जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात हातावर पोट असणारे लोक,छोटे व्यापारी ज्यात चष्मा दुकानदार,कॉम्प्युटर,इलेक्ट्रॉनिक,इलेक्ट्रिक,इस्त्री,पार्लर,सलून,हार्डवेअर,कपडा,सिमेंट,स्टील,फर्निचर यासह इतर दुकाने बंद ठेवावी लागणार आहेत .

एवढंच नाही तर उद्यापासून बार,रेस्टॉरंट, हॉटेल,खानावळी येथे केवळ पार्सल सुविधा सुरू राहील ,कोणालाही या ठिकाणी बसून जेवण करता येणार नाही.
यामुळे सामान्य माणसाच्या हाताचे काम बंद पडणार असून त्याने जगायचे कसे असा प्रश्न बीडमध्ये उपस्थित होत आहे.
बीडचे जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी यानंतर जे आदेश आहेत ते राज्य सरकारने दिलेले आहेत. त्यामध्ये आम्ही फक्त मराठीत रूपांतर केले असून नियमांचे पालन करून सहकार्य करावे असे म्हटले आहे.

error: Content is protected !!