ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

रेमडेसिव्हिर लस काय आमच्या घरी तयार होत नाही, मंत्री भुजबळांचे विधान !

नाशिक: राज्यात वाढत असलेल्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा राज्य सरकारच्या अडचणी वाढताना दिसत आहे. त्यात कोरोना रुग्णावर उपचारासाठी प्रभावी ठरलेली रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा तुटवडा मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात जाणवू लागला आहे. तसेच त्याची मागणी सुद्धा मोठया प्रमाणात वाढलेली आहे.

रेमडेसिव्हिर इंजेक्शनच्या साठया संदर्भात भुजबळांना विचारले असता ते म्हणाले की, माझ्या घरात तर मी इंजेक्शनचा साठा केलेला नाही. कलेक्टरच्या घरातही साठा नाही आणि रेमडेसिव्हिर लस काय आमच्या घरी तयार होत नाही, असं सांगतानाच एखाद्या दुकानात जर साठा करण्यात आलेला असेल आणि मला कळलं तर तिथे जाऊन कारवाई करून इंजेक्शन रुग्णांसाठी उपलब्ध करून देत असतो असे बोलून दाखविले.

पुढे केंद्रावर निशाणा साधताना ते म्हणाले की, अमूकच लस कशाला हवी? मिळेल ती लस घेऊन देशातील जनतेला द्या ना, लसीचा अट्टाहास करू नका. अरे, माणूस जगला पाहिजे, असं छगन भुजबळ म्हणाले. तसेच रेमडेसिव्हिर लस काय आमच्या घरी तयार होत नाही, असं धक्कादायक विधान भुजबळांनी केले आहे.

error: Content is protected !!