ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

लॉकडाऊन विरोधी संघर्ष समिती सोबत जिल्हाधिकाऱ्यांची चर्चा.

लॉकडाऊन विरोधी संघर्ष समिती सोबत जिल्हाधिकाऱ्यांची चर्चा.

🔸अशोक काळकुटे | संपादक

व्यापारी, व्यावसायिकांनी प्रशासनास सहकार्य करावे-जिल्हाधिकारी.

▪️बीड | प्रतिनिधी.
दि.09 एप्रिल 2021 रोजी लॉकडाऊन विरोधी संघर्ष समितीने मा जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन कोरोनाचे सर्व नियम व अटी लावून सर्व दुकानदारांना दुकान सकाळी 10 ते सायंकाळी 06 वाजेपर्यंत चालू ठेवण्याची मागणी करण्यात आली होती, अन्यथा मंगळवारी आम्ही दुकाने सुरू करू असा इशारा देण्यात आला होता. त्यानंतर माननीय जिल्हाधिकारी रवींद्र जगताप साहेबानी लॉकडाऊन विरोधी संघर्ष समितीसोबत चर्चा करून लॉकडाऊन बाबत राज्य सरकार विचारविनिमय करत आहे. व्यापाऱ्यांच्या सर्व भावना शासनास कळवल्या आहेत. तेव्हा ‘लॉकडाऊन संघर्ष समितीने दि 15 एप्रिल पर्यंत संयमाची भूमिका घेऊन अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने न उघडता प्रशासनास सहकार्य करावे, कायदा व सुव्यवस्था बिघडू नये याची काळजी घ्यावी. तेव्हा जिल्हाधिकारी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत प्रशासनाने ठरवलेल्या नियमाप्रमाणे सहकार्य करावे. असे आवाहन लॉकडाऊन विरोधी संघर्ष समितीने केले आहे. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांसह विधानपरिषद आ संजय दौंड हे देखील या बैठकीला उपस्थित होते. लॉकडाऊन विरोधी संघर्ष समितीचे अशोक हिंगे, शफिक भाऊ शेख, अशोक येडे, भास्कर गायकवाड, धनंजय गुंदेकर, सय्यद सादेक, फय्याज कुरेशी आदींसह लॉकडाऊन संघर्ष समितीचे सदस्य उपस्थित होते.

error: Content is protected !!