ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करणार नाही, शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांची माहिती !

देशभरात पुन्हा एकदा कोरोनाने आपलं डोकं वर काढलं आहे. आज वाढत असलेली रुग्णसंख्या पार्श्वभूमीवर केंद्राने CBSC बोर्डाची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचेही जाहीर केले आहे.

दरम्यान राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी राज्यातील दहावीच्या परीक्षा होणार असल्याची माहिती दिली आहे. सध्या तरी दहावी आणि बारावीच्या परीक्षा राज्य सरकार रद्द करणार नाही, असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे. १० वी आणि १२ वीच्या परीक्षा रद्द करण्यात येणार नाही जरी केंद्राने CBSC परीक्षा रद्द केल्यानंतर राज्यातील दहावीच्या परीक्षा रद्द करणार नसल्याचे वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे.

केंद्रीय शिक्षण विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार सीबीएसई परीक्षांबाबत हा निर्णय कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला आहे. दहावीच्या रद्द करण्यात आलेल्या परीक्षांनंतर त्यांच्या गुणपत्रिकांसाठी सीबीएसई बोर्डाकडून विशिष्ट प्रणाली तयार केली जाणार आहे. पण, यामध्ये नेमक्या कोणत्या बाबींचा समावेश असेल? वर्षभरात झालेल्या परीक्षांचे गुण आधारभूत मानले जाणार आहेत का? याविषयी सविस्तर माहिती मिळू शकलेली नाही.

error: Content is protected !!