ब्रेकिंग न्युज
नर्सिंगच्या नवीन अभ्यासक्रमामुळे संधी वाढल्याकुणबी प्रमाणपत्र न मिळाल्याने पालवण येथील मराठा तरुणाची आत्महत्या ..!बिंदुसरा नदीपात्राशेजारील ३०० घरांना महापुराचा धोका ; मान्सुनपुर्व साफसफाईची जिल्हाधिका-यांना मागणी   :- डॉ.गणेश ढवळेआळंदी मंदिरात मोहिनी एकादशी साजरी मंदिरात लक्षवेधी पुष्पसजावट; दर्शनास गर्दीसांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभा

कोरोना महामारीमुळे कुंभार व्यवसाय धोक्यात.

कोरोना महामारीमुळे कुंभार व्यवसाय धोक्यात.

🔸अशोक काळकुटे | संपादक

▪️दिपक मापारी | रिसोड.
उन्हाळ्याला सुरुवात झाली असून मागील काही दिवसात तापमानात वाढ झाली आहे.. या काळात थंड पाण्याने तहान भागविण्यासाठी गरीबाचा फ्रिज म्हणून ओळख असलेल्या मठाला दरवर्षी चांगलीच मागणी असते, मात्र कोरोनामुळे गेल्या वर्षापासून माठ विक्रेत्या कुंभाराच्या आव्याकडे दुकानाकडे नागरिकांचा ओध तुरळक असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.. लॅकडाऊन संचारबंदीचाही फटका बसत आहे. ग्रामीण भागात कुंभार पिढ्यान पिढ्या पारंपारिक पद्धतीने फिरत्या चाकावर माठ तयार केले जातात.. हे माठ बाजारात विक्रीसाठी आणले जातात. मात्र मागील वर्षापासून माठाच्या मागणीत घट होत असल्याचे दिसून येत आहे. दिवसाला केवळ पाच ते दहा विक्री होत असल्याचे व्यवसायिक सांगत आहे. सध्या विविध इलेक्ट्रॉनिक कंपन्या सवलतीच्या दरात फ्रिज तसेच संबंधित इलेक्ट्रॉनिक उपलब्ध करून देत असल्याने व बाजारात कोरोनाची भीतीने नागरिकांचा कल या आधुनिक वस्तूकडे अधिक वाढ आहे. माठाच्या मागणीत घट झाली आहे. परिणामी तालुक्यातील कुंभार बांधवाचा व्यवसाय आर्थिक तोट्यात आला आहे..

error: Content is protected !!