ब्रेकिंग न्युज
कार,मोटारसायकल व बैलगाडीच्या तिहेरी अपघातात एक ठार चार जखमीअलंकापुरीत दिव्यांग बांधवांचे ज्ञानेश्वरी पारायण हरिनाम गजरात  अपयशाने खचून न जाता यशाला जिद्द परिश्रमाच्या जोरावर जीवन प्रकाश’माननर्सिंगच्या नवीन अभ्यासक्रमामुळे संधी वाढल्याकुणबी प्रमाणपत्र न मिळाल्याने पालवण येथील मराठा तरुणाची आत्महत्या ..!बिंदुसरा नदीपात्राशेजारील ३०० घरांना महापुराचा धोका ; मान्सुनपुर्व साफसफाईची जिल्हाधिका-यांना मागणी   :- डॉ.गणेश ढवळेआळंदी मंदिरात मोहिनी एकादशी साजरी मंदिरात लक्षवेधी पुष्पसजावट; दर्शनास गर्दीसांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे 

जि.प सर्कलच्या कोरोना रुग्णांसाठी अनिल गरकळ यांनी केली मोफत जेवणाची व्यवस्था.

जि.प सर्कलच्या कोरोना रुग्णांसाठी अनिल गरकळ यांनी केली मोफत जेवणाची व्यवस्था.

🔸अशोक काळकुटे | संपादक

▪️महेंद्रकुमार महाजन | रिसोड.
वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते व जिल्हा सदस्या उषाताई गरकळ यांनी भर जिल्हा परिषद सर्कल मधील कोरोना बाधित रुग्ण रिसोड किंवा वाशिमला उपचार घेत असतील तर त्यांच्यासाठी अगदी मोफत जेवणाची व्यवस्था केली आहे.सध्या ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या अधिक आहे. तालुक्यात एकमेव शासकीय कोविड केअर सेंटर सवडला आहे तर सिटी केअर हॉस्पिटल व क्रिटिकल केअर सेंटर रिसोड या खाजगी रुग्णालयात तालुक्यातील रुग्ण कोरोना उपचार घेत आहेत तर जास्त सिरिअस असणारे रुग्ण वाशिमच्या शासकीय तथा खाजगी कोविड केअर सेंटर मध्ये उपचार घेत आहेत. या कोरोना संसर्गाच्या काळात सध्या जनसामान्यात संसर्ग होण्याची प्रचंड भीती निर्माण झाली आहे त्यामुळे आप्तवाईक,नातेवाईक कोरोना बाधित रुग्णापासून व त्या परिवारापासून दूर राहतात आणि लॉकडाउन असल्यामुळे नास्ता व जेवणाची सुविधा सहजरित्या उपलब्ध होत नाही.रुग्णांच्या जेवणाच्या प्रश्न गांभीर्याने घेऊन किमान आपल्या भर सर्कल मधील रुग्ण रिसोड किंवा वाशिमला असेल तर त्याच्या जेवणाची व्यवस्था झाली पाहिजे यासाठी वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते अनिल गरकळ भर जिल्हा परिषद सर्कल मधील जो कोणीही कोरोनाबाधित रुग्ण किंवा त्यांचे नातेवाईकांनी संपर्क केल्यास त्यांच्या जेवणाची व्यवस्था करण्याचे ठरविले आहे. हा अत्यंत चांगला उपक्रम असून सामाजिक जबाबदारी म्हणून उदार मनाने केलेले कार्य व सेवा आहे. आशा प्रकारची मदत करून कोरोना लढ्यात सहभाग देणे ही काळाची गरज आहे.

error: Content is protected !!