ब्रेकिंग न्युज
भाजपा व राष्ट्रवादीने वंचित मतदारांना मतदान करण्या पासून रोखले :-अशोक हिंगे यांचा आरोपघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेसध्याच्या तीव्र पाणी टंचाईवर जिल्हाधिकार्‍यांनी तातडीने उपाय योजना करावी – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागरगेवराई तालुक्यातील ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरला डिझेल वाचून वारंवार ब्रेकशेती विकत नसल्याने महिलेचा विनयभंग करून पतीस मारहाण सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकणाऱ्या व्यक्तीवर कारवाई होणारघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेनिघोजे ग्रामपंचायत उपसरपंचपदी इंदिरा फडके बिनविरोध‘सायकल चालवा,हृदयरोग टाळा,पायी चाला हृदय सांभाळा’        आर्वी येथे मंगळवारपासून वार्षिक हरिनाम सप्ताह

भाजपच्या आजी-माजी आमदारांचे ऑक्सिजनसह विविध मागण्यांसाठी हिंगोलीत उपोषण.

भाजपच्या आजी-माजी आमदारांचे ऑक्सिजनसह विविध मागण्यांसाठी हिंगोलीत उपोषण.

🔸अशोक काळकुटे | संपादक

▪️परमेश्वर सावंत | हिंगोली.
जिल्ह्यातील कोविड रुग्णांना आरोग्य सुविधा द्या.तसेच ऑक्सीजन, रेमडेसिवीर इंजेक्शन तुटवडा याकडे सरकारला जागे करण्यासाठी भाजपचे आमदार तान्हाजी मुटकुळे, माजी आमदार गजानन घुगे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरु केले आहे.
शहरासह जिल्ह्यामध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या खुप मोठ्या प्रमाणात वाढत आहे. रुग्णांच्या संख्या लक्षात घेता आरोग्याच्या सुविधा या अपुऱ्या आहेत. त्यामुळे कोरोना रुग्ण तसेच नातेवाईकांचे उपचाराअभावी हाल होत आहेत. कोरोना रुग्णासाठी महत्वाचे असलेले ऑक्सिजन बेड शासकीय रुग्णालयात मिळतच नाहीत. याच बरोबर ऑक्सिजनचा साठ्याचा तुटवडा देखील भासत आहे. रेमडेसिवीर इंजेक्शन देखील गरजेनुसार वेळेत मिळत नाहीत. त्यामुळे इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याचा आरोप आमदार तानाजी मुटकुळे यांनी या वेळी केला आहे. याच बरोबर जिल्हयात कोरोना प्रतिबंधक लस देखील मिळत नाहीत. त्यामुळे अनेक ठिकाणी लसिकरण थांबलेले आहेत. शहरासह जिल्हयात मुबलक प्रमाणात लस उपलब्ध करुन द्यावी. आरटीपीसीआर चाचण्यांचे अहवाल हे वेळेत देणे गरजेचे आहे. यासह इतर मागण्यांकडे महाराष्ट्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी भाजपकडून या अगोदर उपोषणाचा इशारा दिला होता. त्या अनुषंगाने मंगळवारी दहा वाजल्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आजी – माजी आमदारांसह शहरासह जिलह्यातील पदाधिकारी या वेळी उपोषणास बसले आहेत.

error: Content is protected !!