ब्रेकिंग न्युज
भाजपा व राष्ट्रवादीने वंचित मतदारांना मतदान करण्या पासून रोखले :-अशोक हिंगे यांचा आरोपघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेसध्याच्या तीव्र पाणी टंचाईवर जिल्हाधिकार्‍यांनी तातडीने उपाय योजना करावी – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागरगेवराई तालुक्यातील ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरला डिझेल वाचून वारंवार ब्रेकशेती विकत नसल्याने महिलेचा विनयभंग करून पतीस मारहाण सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकणाऱ्या व्यक्तीवर कारवाई होणारघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेनिघोजे ग्रामपंचायत उपसरपंचपदी इंदिरा फडके बिनविरोध‘सायकल चालवा,हृदयरोग टाळा,पायी चाला हृदय सांभाळा’        आर्वी येथे मंगळवारपासून वार्षिक हरिनाम सप्ताह

हिंगोलीत विनाकारण फिरणाऱ्या १०४ जणांच्या तपासणीत पाच पॅाझिटीव्ह.

हिंगोलीत विनाकारण फिरणाऱ्या १०४ जणांच्या तपासणीत पाच पॅाझिटीव्ह.

🔸अशोक काळकुटे | संपादक

▪️परमेश्वर सावंत | हिंगोली.
शहरालगत असलेल्या अकोला बायपास येथील शिवनेरी चौकात दुपारी एक वाजेपर्यंत विनाकारण फिरणाऱ्या १०४ नागरिकांची अँन्टीजेन तपासणी करण्यात आली असून यात पाच जण पॅाझिटीव्ह आढळून आल्याने त्यांना पुढील उपचारासाठी सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले. जिल्ह्यात कडक संचारबंदीचे आदेश असताना काहीजण जिल्हा प्रशासनाने काढलेल्या आदेशाला धुडकावून विनाकारण दुचाकीवर फिरत असल्याचे दिसून येत आहे. शनिवारी बळसोंड ग्रामपंचायत व ग्रामीण पोलिस विभागाकडून संचारबंदी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या १०४ नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली असून यामधे पाच जण बाधित आढळून आले आहेत. त्यांना पुढील उपचारासाठी सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. येथील पोलिस निरीक्षक बळीराम बंधखडखे, सहायक पोलिस उपनिरीक्षक श्रीमती कांबळे, श्री. ठोके, श्री. पोले, श्री. धामणे यांच्यासह संपूर्ण ग्रामीण पोलिस यंत्रणा भर रस्त्यावर उतरुन विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांना अडवून कोरोना चाचणीसाठी पुढाकार घेत होते. यावेळी सरपंच शैलेश जयस्वाल, पप्पू चव्हाण, ग्रामसेवक राजेश किलचे, सुमेध घिके आदींची उपस्थिती होती. यावेळी अतिरिक्त पोलिस अधीक्षक यशवंत काळे सहाय्यक पोलिस अधीक्षक यतिश देशमुख यांनी अँटीजेन तपासणी कॅम्पला भेटी दिल्या. दरम्यान, अकोला बायपास परिसरात विनाकारण, विनामास्क फिरणाऱ्या नागरीकांना रविवार पासून ग्रामपंचायत, पोलिस विभागाकडून प्रत्येकी ५०० रुपयांचा दंड आकारण्यात येणार असल्याचे ग्रामसेवक राजेश किलचे यांनी सांगीतले. तपासणीसाठी डॉ. शेख नावेद, सय्यद इम्रान अली, स्वाती कांबळे, प्रवीण भालेराव, ओम जाधव यांचा सहभाग होता.

error: Content is protected !!