ब्रेकिंग न्युज
मतदार यादीतून नावे गायब झालेल्यांना मतदानाची संधी द्यावी !स्वाराती रूग्णालयातील मशिन व यंत्रसामुग्री दुरूस्त करून रूग्णांचे हाल थांबवाकार,मोटारसायकल व बैलगाडीच्या तिहेरी अपघातात एक ठार चार जखमीअलंकापुरीत दिव्यांग बांधवांचे ज्ञानेश्वरी पारायण हरिनाम गजरात  अपयशाने खचून न जाता यशाला जिद्द परिश्रमाच्या जोरावर जीवन प्रकाश’माननर्सिंगच्या नवीन अभ्यासक्रमामुळे संधी वाढल्याकुणबी प्रमाणपत्र न मिळाल्याने पालवण येथील मराठा तरुणाची आत्महत्या ..!बिंदुसरा नदीपात्राशेजारील ३०० घरांना महापुराचा धोका ; मान्सुनपुर्व साफसफाईची जिल्हाधिका-यांना मागणी   :- डॉ.गणेश ढवळेआळंदी मंदिरात मोहिनी एकादशी साजरी मंदिरात लक्षवेधी पुष्पसजावट; दर्शनास गर्दीसांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्न

विरार दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधान मोदींकडून २ लाखाची मदत !

 

विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयातील अतिदक्षता विभागात भीषण आग लागली आहे. या आघात १३ जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर येत आहे.  तर काही रुग्णांची प्रकृती गंभीर आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना या विजय वल्लभ रुग्णालयातील आगीच्या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहे. त्यात पंत्रप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेत प्राण गमावलेल्या रुग्णांना श्रद्धांजली वाहिली आहे.

तसेच मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांना प्रत्येकी २ लाखाची मदत तसेच जखमी झालेल्या रुग्णांना ५०,००० हजाराची मदत जाहीर करण्यात आलेली आहे. या संदर्भातील माहिती पंतप्रधान कार्यालयाकडून ट्विट करून देण्यात आलेली आहे. या घटनेवर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणाची चैकशी करण्याचे आदेश दिले आहे.

विरार पश्चिमेकडे विजय वल्लभ नावाचे कोव्हिड रुग्णालय आहे. या रुग्णालयातील अतिदक्षता (ICU) विभागात आज रात्री 3 ते 3.30 च्या दरम्यान आग लागली. यावेळी रुग्णालयात ९० जण उपचार घेत होतं. तर आयसीयू वॉर्डमध्ये जवळपास 17 रुग्ण उपचार घेत होते. यातील १३ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.  वसईतील वल्लभ कोव्हिड रुग्णालयातील ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

error: Content is protected !!