ब्रेकिंग न्युज
घाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेनिघोजे ग्रामपंचायत उपसरपंचपदी इंदिरा फडके बिनविरोध‘सायकल चालवा,हृदयरोग टाळा,पायी चाला हृदय सांभाळा’        आर्वी येथे मंगळवारपासून वार्षिक हरिनाम सप्ताहपारगाव सिरस येथे बैलगाडी शर्यतीमध्ये आली रंगत ..!वाढदिवसाचे औचित्य साधत”महावीर के रोटी” उपक्रमांतर्गत अन्नदान १००० कलशधारी सुवासिनी महिलांची प्रभात फेरी ठरणार लक्षवेधीजिल्ह्यात माणुसकी सेवा फाऊंडेशनचा झंझावात…युवकांनी सलोखा , बंधुत्व संबंध जोपासण्याची गरज –  ॲड. सुभाष (भाऊ) राऊतवाढदिवसाचे औचित्य साधत”महावीर के रोटी” उपक्रमांतर्गत अन्नदान 

आईसाठी ऑक्सीजन मागणाऱ्या तरुणाला भाजपा खासदाराने दिली मारण्याची धमकी !

संपूर्ण देशभरात मोठया प्रमाणात कोरोना संसर्गाचा प्रसार झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यात मृत्यूचे प्रमाणही वाढलेले दिसून येत आहे. त्यामुळे मोठया प्रमाणात बेडस,ऑक्सिजन, व्हेंटिलेटर आणि रेमडेसिविर यांची मागणी वदलेली आहे. आज आपल्या रुग्णांचे प्राण वाचण्यासाठी जीवाचे रान करत आहे, मात्र आज भाजपा नेते नागरिकांच्या समस्या जाणून घेण्याऐवजी त्यांना धमक्या देण्याचे काम करत आहे.

मध्यप्रदेशातील दमोह भागातील एका कोवीड केअर सेंटरमध्ये केंद्रीय राज्यमंत्री भाजप खासदार प्रल्हाद पटेल यांनी आईसाठी ऑक्सीजन सिलेंडरची मागणी करणाऱ्या तरुणाला ‘दोन कानाखाली लावीन’ अशी धमकी दिल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. दमोह भागातील कोवीड केअर सेंटरची पाहणी करण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद पटेल तिथे पोहोचले होते.

मंत्री महाडोया तेथे पोहचलेले असताना मीडियाचे कॅमेरे समोर असताना केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांना कोरोना संक्रमित रुग्णाच्या एका नातेवाईकाने ऑक्सिजनच्या कमतरतेबद्दल तक्रार करत जाब विचारला. मात्र ही गोष्ट भाजप खासदारांना रुचली नाही. त्यामुळे त्यांनी तरुणाला ‘दोन झापडी’ ठेवून देण्याची धमकी दिली. यावर झापडी खाईन पण ऑक्सिजनची व्यवस्था तर करा असं म्हणत तरुणाने आपली हतबलता व्यक्त केली.

error: Content is protected !!