ब्रेकिंग न्युज
मतदार यादीतून नावे गायब झालेल्यांना मतदानाची संधी द्यावी !स्वाराती रूग्णालयातील मशिन व यंत्रसामुग्री दुरूस्त करून रूग्णांचे हाल थांबवाकार,मोटारसायकल व बैलगाडीच्या तिहेरी अपघातात एक ठार चार जखमीअलंकापुरीत दिव्यांग बांधवांचे ज्ञानेश्वरी पारायण हरिनाम गजरात  अपयशाने खचून न जाता यशाला जिद्द परिश्रमाच्या जोरावर जीवन प्रकाश’माननर्सिंगच्या नवीन अभ्यासक्रमामुळे संधी वाढल्याकुणबी प्रमाणपत्र न मिळाल्याने पालवण येथील मराठा तरुणाची आत्महत्या ..!बिंदुसरा नदीपात्राशेजारील ३०० घरांना महापुराचा धोका ; मान्सुनपुर्व साफसफाईची जिल्हाधिका-यांना मागणी   :- डॉ.गणेश ढवळेआळंदी मंदिरात मोहिनी एकादशी साजरी मंदिरात लक्षवेधी पुष्पसजावट; दर्शनास गर्दीसांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्न

जनतेच्या हितार्थ जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या इमारतीमध्ये कोविड सेंटर करा-प्रा.सचिन उबाळे.

जनतेच्या हितार्थ जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या इमारतीमध्ये कोविड सेंटर करा-प्रा.सचिन उबाळे.

🔸अशोक काळकुटे | संपादक

▪️बीड | प्रतिनिधी.
दि.२४ कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्यामुळे बेड कमी पडत आहेत. त्यामुळे प्रशासन नवीन बेडसाठी इमारतीच्या शोधात आहे. त्यासाठी सोयीयुक्त जिल्हा परीषद व पंचायत समितीच्या इमारती आहेत. या दोन्ही इमारती ताब्यात घेऊन त्यामध्ये कोविड सेंटर करावे अशी मागणी स्वाभिमान संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रा.सचिन भैया उबाळे व बाळासाहेब कदम यांनी केली आहे.
कोरोना बाधितांचा संख्या वाढत असल्यामुळे जागे अभावी व वाढत्या रुग्णांमुळे यंत्रणाच्या नजरेबाहेर उघडलेली कोविड सेंंटर कर्मचार्‍यांच्या कमी संख्येमुळे रुग्णांचे हाल होत आहेत. तसेच अनेकांचे जीव ही जात आहेत. अशा परिस्थितीत जिल्हा रुग्णालय आणि प्रशासकिय यंत्रणेला या समस्येवर मात करण्यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समितीची इमारत सोयीयुक्त आहे. यामध्ये एका हॉलमध्ये 100 बेड असे 400 बेड बसू शकतील एवढा त्यांचा मोठा अवाका या हॉलचा आहे. त्यामुळे वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन इकडे तिकडे इमारत शोधण्यापेक्षा ताबडतोब ही इमारत ताब्यात घ्यावी, अशी मागणी स्वाभिमान संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रा.सचिनभैय्या उबाळे, बाळासाहेब कदम यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे.

▪️▪️
जिल्हाधिकार्‍यांचा सकारात्मक प्रतिसाद
प्रा.सचिन भैय्या उबाळे यांनी जिल्हा परिषद व पंचायत समितीची इमारत ताब्यात घेतल्यास त्याचा चांगला उपयोग होऊ शकतो. हे पटवून सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली. त्यानंतर जिल्हाधिकारी यांनी पंचायत समितीची इमारत ताब्यात घेण्यासंदर्भात सकारात्मक प्रतिसाद दिला.

error: Content is protected !!