ब्रेकिंग न्युज
भाजपा व राष्ट्रवादीने वंचित मतदारांना मतदान करण्या पासून रोखले :-अशोक हिंगे यांचा आरोपघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेसध्याच्या तीव्र पाणी टंचाईवर जिल्हाधिकार्‍यांनी तातडीने उपाय योजना करावी – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागरगेवराई तालुक्यातील ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरला डिझेल वाचून वारंवार ब्रेकशेती विकत नसल्याने महिलेचा विनयभंग करून पतीस मारहाण सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकणाऱ्या व्यक्तीवर कारवाई होणारघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेनिघोजे ग्रामपंचायत उपसरपंचपदी इंदिरा फडके बिनविरोध‘सायकल चालवा,हृदयरोग टाळा,पायी चाला हृदय सांभाळा’        आर्वी येथे मंगळवारपासून वार्षिक हरिनाम सप्ताह

अंबड तालुक्यात कोविड लसीचा तुटवडा

लस उपलब्ध नसल्याने काही लसीकरण केंद्र बंद

गणेश जाधव|संपादक

गेल्या दोन-तीन दिवसांपासून अंबड तालुक्यातील बहुतांश प्राथमिक केंद्रांवर कोविड लसिचा तुटवडा निर्माण झाला आहे. तर काही केंद्रांवरील लस संपली आहे. कोविडयोद्ध्यांसह आजवर जिल्ह्यात लस टोचून घेणा-यांची संख्या १४ हजार ९५४ एवढी झाली आहे.
कोविडची दुसरी लाट थोपविण्यासाठी प्रतिबंधक उपाययोजनेबरोबरच लसीकरण मोहीमेला वेग देण्याची गरज तज्ज्ञ मंडळी व्यक्त करीत आहेत. तथापि या मोहिमेला अद्यापहि म्हणावा असा वेग आलेला नाही. त्यातच ब-याच ठिकाणी लसीअभावी मोहीम थंडावली आहे.तालुका प्रशासनाने लसीची मागणी नोंदविली आहे. पुढील दोन तीन दिवसांत लसीचा पुरवठा पुर्ववत होण्याची अपेक्षा आहे. आजवर लसीकरणाच्या संख्येत मोठी संख्या कोविड योद्ध्यांचीच आहे. मागील आठवड्यात लसीकरणाला ब-यापैकी वेग येऊ लागला होता. त्यातच तुटवडा निर्माण झाल्याने ही मोहीम थंडावली.
या बाबत तालुका आरोग्य अधिकारी विलास रोडे यांच्यासोबत संपर्क साधला असता ते म्हणाले, ब-याच ठिकाणची लस संपली आहे. त्यात प्राथमिक आरोग्य केंद्रांची संख्या अधिक आहे. तालुक्याभरातून मिळालेल्या माहितीच्या आधारे आज लसीची मागणी नोंदविली आहे

error: Content is protected !!