ब्रेकिंग न्युज
भाजपा व राष्ट्रवादीने वंचित मतदारांना मतदान करण्या पासून रोखले :-अशोक हिंगे यांचा आरोपघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेसध्याच्या तीव्र पाणी टंचाईवर जिल्हाधिकार्‍यांनी तातडीने उपाय योजना करावी – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागरगेवराई तालुक्यातील ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरला डिझेल वाचून वारंवार ब्रेकशेती विकत नसल्याने महिलेचा विनयभंग करून पतीस मारहाण सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकणाऱ्या व्यक्तीवर कारवाई होणारघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेनिघोजे ग्रामपंचायत उपसरपंचपदी इंदिरा फडके बिनविरोध‘सायकल चालवा,हृदयरोग टाळा,पायी चाला हृदय सांभाळा’        आर्वी येथे मंगळवारपासून वार्षिक हरिनाम सप्ताह

छावा जिल्हाध्यक्ष ठोंबरे यांच्या वाढदिवसानिमित्त उपजिल्हारुग्णालयास विविध साहित्यांचे वाटप.

छावा जिल्हाध्यक्ष ठोंबरे यांच्या वाढदिवसानिमित्त उपजिल्हारुग्णालयास विविध साहित्यांचे वाटप.

🔸अशोक काळकुटे | संपादक

▪️नंदकुमार मोरे | केज.
दि.5 सध्या राज्यासह केज तालुका कोरोनाच्या विळख्यात सापडला असून दैनंदिन रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे त्याचा आरोग्य यंत्रणेवर ताण पडतो आहे आपलं जीवन धोक्यात घालून आरोग्य प्रशासन काम करत आहे.ही बाब लक्षात घेऊन छावा मराठा संघटना बीड जिल्हा प्रमुख तथा सामाजिक चळवळीतील सक्रिय नेतृत्व मा. श्री . शिवाजी (दादा) ठोंबरे यांच्या वाढदिवसानिमित्त केज येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या कोवीड सेंटरला डॉक्टर व रुग्णांना लागणारे साहित्य सामाजिक उपक्रम म्हणुन वाटप करण्यात आले.
दरवर्षी शिवाजी दादा ठोंबरे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात येतो आणि त्यामाध्यमातून गोरगरीब अनाथ अपंग व गरजुना मदत करण्यात येते गेल्या वर्षी देखील वाढदिवसानिमित्त गरजूंना किराणा साहित्याचे वाटप करून वाढदिवस साजरा केला होता त्याचप्रमाणे याही वर्षी कोरोना संकट काळात उपजिल्हा रुग्णालयाच्या शासकीय कोव्हीड सेंटरला लागणारे सॅनिटायझर, मास्क, व्हिटॅमिन सी झिंक टॅबलेट व डॉक्टरांसाठी लागणाऱ्या पीपीइ किट चे वाटप सामाजिक उपक्रम म्हणून करण्यात आले.यावेळी रुग्णालयाचे प्रभारी अधीक्षक डॉ. सोळंके,डॉ.चाळक,डॉ.नागरगोजे,पत्रकार दिनकर राऊत,पत्रकार अनिल गलांडे,युवापत्रकार दत्तात्रय मुजमुले,गणेश वैरागे,उद्धव ठोंबरे ,सह रुग्णालयाचे कर्मचारी उपस्थित होते.

error: Content is protected !!