ब्रेकिंग न्युज
भाजपा व राष्ट्रवादीने वंचित मतदारांना मतदान करण्या पासून रोखले :-अशोक हिंगे यांचा आरोपघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेसध्याच्या तीव्र पाणी टंचाईवर जिल्हाधिकार्‍यांनी तातडीने उपाय योजना करावी – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागरगेवराई तालुक्यातील ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरला डिझेल वाचून वारंवार ब्रेकशेती विकत नसल्याने महिलेचा विनयभंग करून पतीस मारहाण सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकणाऱ्या व्यक्तीवर कारवाई होणारघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेनिघोजे ग्रामपंचायत उपसरपंचपदी इंदिरा फडके बिनविरोध‘सायकल चालवा,हृदयरोग टाळा,पायी चाला हृदय सांभाळा’        आर्वी येथे मंगळवारपासून वार्षिक हरिनाम सप्ताह

१८ वर्षांवरील लसीकरणासाठी टप्पे करणार.

१८ वर्षांवरील लसीकरणासाठी टप्पे करणार.

🔸अशोक काळकुटे | संपादक

▪️कृष्णा आंधळे | प्रतिनिधी.
महाराष्ट्रात लसींचा तुटवडा असल्याने १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाबाबत विविध टप्पे केले जाणार आहेत. यामध्ये वय आणि व्याधीनुसार टप्पे केले जाणार असून सार्वजनिक आरोग्य विभाग त्यानुसार नियोजन करत आहे. ३५ ते ४४ या वयोगटातल्या लोकांना प्राधान्य देता येईल का ? त्यातही व्याधी असलेल्यांना प्रथम प्राधान्य देता येऊ शकेल का याबाबत चर्चा सुरू आहे. राज्यात लसींचा पुरेसा पुरवठा होण्यासाठी रशियाची स्पुटनिक लस मागवण्यासंदर्भात रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडशी ( आरडीआयएफ ) चर्चा सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. जागतिक निविदेच्या माध्यमातून ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर खरेदी करायची आहे. या यंत्राच्या तांत्रिक बाबी तपासणीसाठी तीन डॉक्टरांची समिती नेमण्यात आली आहे.

बालकांना कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका.

कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता असून, त्यात बालकांना संसर्ग होईल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. म्हणून बालरोग तज्ज्ञांचा एक टास्क फोर्स तातडीने तयार करण्यात येणार असल्याचे टोपे यांनी सांगितले. रुग्णालयातील खाटांची संख्या वाढविणे, बालकांसाठीचे व्हेंटिलेटर्स, एनआयसीयूमधील बेड यांची तयारी करण्यात येत असून, या सुविधा वाढविण्यावर भर दिला जात आहे.

error: Content is protected !!