ब्रेकिंग न्युज
वाढदिवसाचे औचित्य साधत”महावीर के रोटी” उपक्रमांतर्गत अन्नदान स्मशानभूमी अभावी अंत्यसंस्कार करताना वाद ही लाजीरवाणी बाब मात्र लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला सोयरसुतक नाही:- डॉ.गणेश ढवळेसोयाबीन पेरणी पूर्वी उगवण क्षमता तपासा :- कृषी विभागाचे आवाहन.स्नेह-75 च्यावतीने जागतिक कुटूंब दिनानिमित्त शर्मा परिवाराचा सत्कारजामखेड कृषी उत्पन्न बाजारचे सभापती पै. शरद कार्ले यांच्या सभापती पदाची वर्षपुर्ती.घाटशीळ पारगावात व्यापाऱ्याला मारहाणटँकरने पाणी पुरवठाबाबत अडचणी आल्यास संपर्क क्रमांकावर तक्रार करावीजातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवजामखेड येथे मधूरजल प्युअर वाॅटर चे उद्घाटन संपन्नरणविर काका पंडीत यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

होमगार्ड जवान कृष्णा दिलीप पावडे याच्या शस्त्रक्रियेसाठी समाजबांधवांची मदत

होमगार्ड जवान कृष्णा दिलीप पावडे याच्या शस्त्रक्रियेसाठी समाजबांधवांची मदत

दैनिक सूर्योदय पुणे : संपादक संजय दाते पाटील
०२ जून २०२१
वाडा (ता.खेड) : पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात दुर्गम भागात राहणारा शेतकरी कुटुंबातील युवक कु. कृष्णा दिलीप पावडे, वय २२ हा होमगार्ड म्हणून कर्तव्य बजावत आहे. त्यास कावीळ प्रकारचा आजार झाल्याने  चिंचवड येथील आदित्य बिर्ला रुग्णालयात दाखल केले आहे.  त्यास उपचारासाठी २० लाख रुपये लागणार असून परिस्थिती हालाकीची असल्याने पावडे कुटुंबाच्या वतीने विविध व्हॉटसअप ग्रुप, सोशल मिडिया तसेच पत्रकार बांधवांच्या माध्यमातून आर्थिक मदतीचे आवाहन करण्यात आले होते. त्याला चांगला प्रतिसाद येत असून विविध संघटना व  राजकीय नेते तसेच सर्वसामान्य जनतेतूनही मदत मिळत आहे. जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख, जिल्हा परिषद सदस्या सौ.तनुजाताई संदीपशेठ घनवट,आळंदी चे नगरसेवक संदीप रासकर, गायत्री शक्तीपीठ राजगुरुनगर शाखा, हुतात्मा राजगुरू सोशल फाउंडेशन राजगुरुनगर तसेच इतर अनेक जणांनी मोठी रक्कम कृष्णा पावडे यांच्या मदती साठी दिली आहे.
विविध व्हॉटसअप ग्रुप च्या माध्यमातून देखील कृष्णा पावडे याच्या मित्र मंडळीनी रक्कम जमविली आहे ती पावडे कुटुंबाकडे सुपूर्द करण्यात येणार आहे.
कावीळ या आजारामुळे सदर तरुणाचे किडनी व लिव्हर खराब झाले आहे.  गरीब शेतकरी कुटुंबातील हा सदस्य असून घरातील एकुलता एक कमावता आहे. लिव्हर प्रत्यारोपणासाठी त्याची बहिण तयार झालेली आहे परंतु ऑपरेशनचा खर्च भरपूर असल्याकारणाने सार्वजनिक स्तरातून मदत करण्याचे पावडे कुटुंबीय करत आहे.
  शेतीच्या हिस्स्या साठी भांडणे होण्याच्या काळात एक बहिण भावासाठी स्वताचे लिव्हर देत आहे, या साठी देखील सर्व स्तरातून त्या बहिणीचे कौतुक होत आहे.
मदतीसाठी आपण गुगुल पे / फोन पे साठी पुढील नंबर वर मदत अथवा संपर्क करण्याचे आवाहन त्यांच्या कुटुंबाकडून करण्यात येत आहे.  ९६८९९९३८२० व ७७७६००३८३९
प्रतिनिधी : विनायक जठार (खेड तालुका)

error: Content is protected !!