ब्रेकिंग न्युज
भाजपा व राष्ट्रवादीने वंचित मतदारांना मतदान करण्या पासून रोखले :-अशोक हिंगे यांचा आरोपघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेसध्याच्या तीव्र पाणी टंचाईवर जिल्हाधिकार्‍यांनी तातडीने उपाय योजना करावी – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागरगेवराई तालुक्यातील ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरला डिझेल वाचून वारंवार ब्रेकशेती विकत नसल्याने महिलेचा विनयभंग करून पतीस मारहाण सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकणाऱ्या व्यक्तीवर कारवाई होणारघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेनिघोजे ग्रामपंचायत उपसरपंचपदी इंदिरा फडके बिनविरोध‘सायकल चालवा,हृदयरोग टाळा,पायी चाला हृदय सांभाळा’        आर्वी येथे मंगळवारपासून वार्षिक हरिनाम सप्ताह

आमदार रवि राणा यांचा जिल्हा दौरा.. जिल्हातील कोविड सेंटर व रुग्णालयांची केली संपुर्ण पाहणी व चौकशी..

आमदार रवि राणा यांचा जिल्हा दौरा..

जिल्हातील कोविड सेंटर व रुग्णालयांची केली संपुर्ण पाहणी व चौकशी..

 

पंकज हिरुळकर अमरावती जिल्हा प्रतिनिधि;

 

खासदार सौ नवनीत रवी राणा यांच्या माधम्यातून पी एम केयर फंडातून अमरावती शहरात जम्बो ऑक्सिजन प्लांट तसेच लवकरच प्रत्येक तालुक्यात उभारण्यात येणार ऑक्सिजन प्लांट,प्रत्येक ग्रामीण रुग्णालयात आवश्यकतेनुसार बेड,व्हेंटिलेटर आदी सुविधा पुरविणार,,कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी पी एम केयर फंडातून ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा सक्षम करणार -कोविड रुग्णसंवाद दौऱ्यांतर्गत आमदार रवी राणा यांची अंजनगाव सुर्जी,अचलपूर -परतवाडा तालुका रुग्णालय व कॉरोन्टीन सेंटर भेटी दरम्यान माहिती,,थेट कोविड वार्डात जाऊन रुग्णासोबत आपुलकीने संवाद साधून त्यांच्या व्यथा व अडचणी जाणून घेणारे रवी राणा हे पहिले आमदार-रुग्णांच्या प्रतिक्रिया

अंजनगाव सुर्जी ग्रामीण रुग्णालय,कोरोन्टीन सेन्टर ,अचलपूर उपजिल्हा रुग्णालय,बुरडघाट कॉरोन्टीन सेन्टर ला आमदार रवी राणा यांची थेट भेट अनेक कमतरता आढळल्या,अपुरे व अस्वच्छ बेड ,दुर्गंधीयुक्त स्वछतागृहे,निकृष्ट दर्जाचे भोजन आदी बाबी आढल्यामुळे संतप्त आमदार रवी राणा यांनी तहसीलदार,नगरपरिषद मुख्याधिकारी व आरोग्य अधिकाऱयांची केली कानउघाडणी, रुग्णांना चांगल्या दर्जाच्या सर्व सोयी सुविधा पुरवा अन्यथा खैर नाही–आमदार रवी राणा यांचा इशारा

कंत्राटी पद्धतीने काम करणारे डॉक्टर,आरोग्य सेवक व सुरक्षा रक्षक यांचे वेतन अपुरे,,कंत्राटी कर्मचारी पुरवणाऱ्या ठेकेदाराकडून लूट,,

अंजनगाव सुर्जी/अचलपूर–जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आमदार रवि राणा हे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.आज त्यांनी अंजनगाव सुर्जी -अचलपूर-परतवाडा येथील ग्रामीण रुग्णालय,उपजिल्हा रुग्णालय व कोविड सेन्टर तसेच कॉरोन्टीन सेन्टर ला भेटी देऊन पाहणी केली.या दौऱ्याचे वैशिष्टय म्हणजे केवळ बाहेरून पाहणी न करता आमदार रवी राणा थेट कोविड वार्डात गेले व कोविड रुग्णासोबत संवाद साधला.

अंजनगाव सुर्जी ग्रामीण रुग्णालय भेटीत माजी आमदार रमेश बुंदीले,नगराध्यक्ष कामलकांत लाडोळे,वैद्यकीय अधिकारी डॉ रहाटे, डॉ, डोंगरे यांना सोबत घेऊन आमदार रवी राणा यांनी संपूर्ण रुग्णालयाची पाहणी केली. अंजनगाव सुर्जी येथे150 बेड ची क्षमता असून ऑक्सिजन बेड 30 आहेत व सद्यस्थितीत तेथे 70 रुग्ण आहेत.या ठिकाणी असणाऱ्या रुग्णांच्या तक्रारी आमदार रवी राणा यांनी थेट भेट घेऊन जाणून घेतल्या. युवा स्वाभीमान पदाधिकारी मंगेश कोकाटे,अजय देशमुख, विठ्ठल ढोले,सुहास मोरे,अमोल दाभाडे, निलेश देशमुख,दशरथ येवले,तौसिफ भाई,लिलाबाई डिके,पवन गुहे,महेंद्र भगत यांनी सदर ठिकाणी काम करणारे कंत्राटी कामगार यांची आर्थिक पिळवणूक होत असल्याचे व कंत्राटदार त्यांना कमी वेतन देत असल्याचे आमदार रवी राणा यांचे लक्ष्यात आणून दिले यावेळी आमदार रवी राणा यांनी यात तात्काळ लक्ष घालून इमानेइतबारे सेवा करणाऱ्या आरोग्य सेवकांवर अन्याय होऊ देणार नसल्याचे अभिवचन दिले.

यानंतर आमदार रवी राणा यांनी अचलपूर परतवाडा येथील बुरडघाट कॉरोन्टीन सेन्टर ला भेट दिली. या ठिकाणी 76 बेडची व्यवस्था असून 27 रुग्ण भरती असल्याचे आढळून आले,डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहात 85बेड असून तेथे 48 रुग्ण व कुटीर रुग्णालयात 71 बेड,आय सी यु चे 20 बेड व्यवस्था असून 51 रुग्ण भरती असल्याचे आढळून आले.यावेळी डॉ पाटील,डॉ टेकाडे मॅडम,अधीक्षक विजय वानखडे,डॉ किरण शिंदे,डॉ झाकीर साहेब यांना सोबत घेऊन संपूर्ण रुग्णालयाची पाहणी आमदार रवी राणा यांनी केली.रुग्णांना ज्या सुविधा आवश्यक आहेत त्या तात्काळ पुरविण्यात याव्या ,त्यांना पोषण आहार,प्रतिकार क्षमता वाढेल असे अन्न पुरवठा व चांगली साफसफाई आदी सुविधा देण्याचे निर्देश आमदार रवी राणा यांनी संबंधितांना दिले.

खासदार सौ नवनीत रवी राणा यांनी अमरावती मध्ये जम्बो ऑक्सिजन प्लांट मंजूर केला असून त्याची उभारणी व लोकार्पण लवकरच होणार आहे.तसेच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी खासदार सौ नवनीत राणा यांचे माध्यमातून पी एम फंडातून बेड,व्हेंटिलेटर, ऑक्सिजन प्लांट ,औषधी आदी सुविधा मोठ्या प्रमाणात उपलब्ध करण्यात येतील असे आमदार रवी राणा यांनी यावेळी सांगितले.या भेटीदरम्यान आमदार रवी राणा यांचे समवेत जिल्हाध्यक्ष जितू दुधाने,मेळघाट संपर्क प्रमुख उपेन बचले, अचलपूर संपर्क प्रमुख बंटी केजरीवाल, राजू लोहिया,मनीष अग्रवाल,तालुकाध्यक्ष रवी गवई,पुरुषोत्तम बोरेकर, अनुराग चांदनांनी,वैभव गोस्वामी,पवन कापशिकर,रवी वानखडे, बबलू वानखडे,सुजय काळे,नितीन यादव, रवी साखरे,गोलू अथोटे, ठक्कर साहेब,अविनाश तापडिया,कैलाश गणेशे, खुश उपाध्याय,दीपक जलतारे,पवन हिंगणे,सचिन सोनोने,मंगेश कोकाटे,तमीज शहा आदी उपस्थित होते

error: Content is protected !!