ब्रेकिंग न्युज
भाजपा व राष्ट्रवादीने वंचित मतदारांना मतदान करण्या पासून रोखले :-अशोक हिंगे यांचा आरोपघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेसध्याच्या तीव्र पाणी टंचाईवर जिल्हाधिकार्‍यांनी तातडीने उपाय योजना करावी – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागरगेवराई तालुक्यातील ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरला डिझेल वाचून वारंवार ब्रेकशेती विकत नसल्याने महिलेचा विनयभंग करून पतीस मारहाण सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकणाऱ्या व्यक्तीवर कारवाई होणारघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेनिघोजे ग्रामपंचायत उपसरपंचपदी इंदिरा फडके बिनविरोध‘सायकल चालवा,हृदयरोग टाळा,पायी चाला हृदय सांभाळा’        आर्वी येथे मंगळवारपासून वार्षिक हरिनाम सप्ताह

जागतिक पर्यावरण दिन झाला आगळावेगळा साजरा !

*जनार्दन चव्हाण*

*दै.सूर्योदय विंचूर प्रतिनिधी*

*७३८५०७०१७७*

 

 

जागतिक पर्यावरण दिन झाला आगळावेगळा साजरा !

 

 

*जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शेकडेा पर्यावरण प्रमींनी दुतर्भा उभे राहून राबविले नंदिनी नदी पुनरज्जीवन व संवर्धन अभियान.*

————————————

(नाशिक) :- नाशिक- जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून पर्यावरण प्रेमींनी नंदिनी नदीला गतवैभव प्राप्त व्हावे म्हणून नंदिनी नदीच्या १५ किलोमीटर अंतराच्या १० टप्यांत नदी प्रदूषण मुक्त व्हावी यासाठी नंदिनी नदीच्या तळेगांव (अंजनेरी) येथील उगमस्थानापासून ते टाकळी येथील संगमस्थानापर्यंत दुतर्फा पर्यावरण प्रेमींची आरोग्य साखळीव्दारे स्वच्छता राखली जावी यासाठी नाशिक भाजपाच्या पर्यावरण मंचातर्फे नंदिनी नदी प्रदुषणाच्या विळख्यातून मुक्त होण्यासाठी नागरीकांमध्ये जनजागरण मोहिम राबविण्यात आली.या मोहिमेत भाजपाच्या शेकडो पर्यावरण प्रेमींनी सहभाग नोंदवला अशी माहिती नंदिनी नदी पुनरज्जीवन व संवर्धन अभियान,भाजप प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी यांनी दिली. पुढे सावजी म्हणाले की, गुरुवार दि.२४ जून रोजी वटसावित्री पोर्णिमेच्या मुहूर्तावर भाजपातील पर्यावरण प्रेमी महिला राबविणार ३००० हजार वृक्षरोपणाची मोहिम राबविण्यात येणार आहे. तत्पुर्वी वृक्षारोपणासाठी महापालिकाच्या सहकार्याने जागा निश्चिती करण्यात येईल.

हि मोहिम यशस्वी होण्यासाठी भाजप महानगर अध्यक्ष गिरीश पालवे, भाजप शहर संघटन सरचिटणीस प्रशांत जाधव, पर्यावरण मंच संयोजक उदय थोरात, प्रकल्प संयोजक, प्रदेश भाजप सरचिटणीस देवयानी फरांदे, प्रदेश उपाध्यक्ष खा.भारती पवार, प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब सानप, महापौर सतिष नाना कुलकर्णी, आ.सीमाताई हिरे, आ.राहुल ढिकले, उपमहापौर भिकुबाई बागुल, स्थायी समिती सभापती गणेश गिते, सभागृहनेते कमलेश बोडके, गटनेते अरूण पवार, भास्करराव घोडेकर, देवदत्त जोशी, सुनिल देसाई, अविनाश पाटील, शिवाजी बरके,अमोल इघे, महापौर सतीश नाना कुलकर्णी,स्वाती वटारे नगर सेविका अर्चना थोरात आदींनी विशेष परिश्रम घेतले.

टाकळी ते पुणे रोड नंदिनी नदी पूल उत्तर बाजूने , पुणे रोड नंदिनी पूल ते मुंबई नाका उत्तर बाजूस,

पुणे रोड नंदिनी पूल ते मुंबई नाका दक्षिण इत्यादी ठिकाणी

भाजपा पदाधिकारी व परिसरातील पर्यावरण प्रेमी उपस्थित होते.

 

यावेळी पर्यावरण प्रेमींनीमाय नंदिनीला हवे जीवनदान..चला राबवू स्वच्छता अभियान, ओळखा आपली जबाबदारी कचरा नका टाकू नंदिनीच्या तिरी. नंदिनीचा श्वास गुदमरला आहे,गटारीच्या घाणीनं भरला आहे,स्वच्छता अभियानं छेडायचा संकल्प ठरला आहे.नंदिनी करू स्वच्छ निर्मळ आरोग्याचे फुलवू कमळ शुद्ध पाणी. स्मार्ट सिटी नाशिक साठीस्वच्छता आणू नंदिनी काठी ,नंदिनी वाचली तर नाशिक वाचेल..स्वच्छतेने शहरात आरोग्य नांदेल, नदी नंदिनी जर स्वच्छ झाली..नाशिक होईलच वैभवशाली, मनात जागवा स्वच्छतेचा ध्यास..नंदिनी मागतेय मोकळा श्वास, माय नंदिनीचा करा सन्मान..नदीपात्रात टाकू नका घाण, प्रदुषणमुक्ती ने देऊ, नाशिकला नवा आकार ..स्वच्छ निर्मळ नंदिनीचे स्वप्न करू साकार…असे घोषणांचे फलक हातात घेवून पर्यावरण जनजागृतीच्या घोषणा या पर्यावरण प्रेमीनी दिल्या.

error: Content is protected !!