ब्रेकिंग न्युज
भाजपा व राष्ट्रवादीने वंचित मतदारांना मतदान करण्या पासून रोखले :-अशोक हिंगे यांचा आरोपघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेसध्याच्या तीव्र पाणी टंचाईवर जिल्हाधिकार्‍यांनी तातडीने उपाय योजना करावी – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागरगेवराई तालुक्यातील ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरला डिझेल वाचून वारंवार ब्रेकशेती विकत नसल्याने महिलेचा विनयभंग करून पतीस मारहाण सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकणाऱ्या व्यक्तीवर कारवाई होणारघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेनिघोजे ग्रामपंचायत उपसरपंचपदी इंदिरा फडके बिनविरोध‘सायकल चालवा,हृदयरोग टाळा,पायी चाला हृदय सांभाळा’        आर्वी येथे मंगळवारपासून वार्षिक हरिनाम सप्ताह

निंभोरा येथील महिलांचा रौद्रवतार ; दारूबंदी वरुन महिला झाल्या आक्रमक.

निंभोरा येथील महिलांचा रौद्रवतार ; दारूबंदी वरुन महिला झाल्या आक्रमक.

🔸अशोक काळकुटे | संपादक

निंभोरा बु.येथील अवैध दारू विक्री बंद करण्यासाठी सरपंच ग्रामपंचायतला दिले निवेदन.

▪️राजेंद्र महाले | रावेर.
रावेर तालुक्यातील निंभोरा बु येथे कोळी वाडयातील 30 ते 40 महिलांनी एकत्र येऊन अवैध दारू बंदीसाठी कंबर कसली असून सरपंच व ग्रामपंचायतीला निवेदन देऊन
त्या निवेदनात निंभोरा बु गावात मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री होत असून लहान मोठे तरूण मोठ्या प्रमाणात व्यसनाधीन होत आहे.आणि सर्वात जास्त येथील कोळी वाड्यात अवैधदारू विक्री होते, त्या मुळे मृत्यूदर वाढला असून १७ ते ३० या वयोगटातील पुरूषांची व्यसनाधीन संख्या वाढत असून लहान वयोगटातील मुलांनाही त्याचे व्यसन लागत आहे.कोळी वाड्यातील महीला व नागरीकांना याचा खुप त्रास सहन करावा लागत आहे. आजच्या पीढीला व्यसनाधीनते पासून वाचवावे, निवेदन महिलांनी प्रथम निंभोरा ग्रामपंचायत सरपंच सचिन महाले यांना दिले असून. संबंधीत अधिकारींना फैजपूर पोलीस उपविभागीय कार्यालय फैजपूर, प्रांत ऑफिस फैजपूर यांना ही निवेदन देण्यात येणार असल्याचे महिलांनी दै.सुर्यदय न्युज शी बोलतांना सांगीतले.
अवैध दारू (पन्नी) यात नशेसाठी विषारी द्रव मिळविला जातो. हि शरीराला खुप घातक असून युवा पिढी मृत्यूच्या दारी ओढवली जात आहे. याकडे अधिकारी वर्गाने विशेष लक्ष देवून अवैध दारू विक्री थांबवावी.असे निवेदनात नमूद आहे.
मागे दिड महिण्यापुर्वी निंभोरा पो. निरीक्षक श्री स्वप्निल उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध दारू व धंद्यांवर निंभोरा सह परिसरात वॉशआऊट करून गुन्हे दाखल करून आरोपीच्या मुसक्या आवरल्या होत्या.

error: Content is protected !!