ब्रेकिंग न्युज
भाजपा व राष्ट्रवादीने वंचित मतदारांना मतदान करण्या पासून रोखले :-अशोक हिंगे यांचा आरोपघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेसध्याच्या तीव्र पाणी टंचाईवर जिल्हाधिकार्‍यांनी तातडीने उपाय योजना करावी – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागरगेवराई तालुक्यातील ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरला डिझेल वाचून वारंवार ब्रेकशेती विकत नसल्याने महिलेचा विनयभंग करून पतीस मारहाण सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकणाऱ्या व्यक्तीवर कारवाई होणारघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेनिघोजे ग्रामपंचायत उपसरपंचपदी इंदिरा फडके बिनविरोध‘सायकल चालवा,हृदयरोग टाळा,पायी चाला हृदय सांभाळा’        आर्वी येथे मंगळवारपासून वार्षिक हरिनाम सप्ताह

लिंबागणेशकरांचा ध्यास, वृक्षलागवड आणि संवर्धनाचा ,गाव हिरवंगार करण्याचा:- डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर

लिंबागणेशकरांचा ध्यास, वृक्षलागवड आणि संवर्धनाचा ,गाव हिरवंगार करण्याचा:- डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
बीड :-
कोरोना कालावधीत विकत घ्यावा लागणारा ऑक्सिजन माणसाला खुप काही शिकवुन गेला, त्यामुळेच भविष्यात पुन्हा ही वेळ येऊ नये म्हणून वृक्षलागवड आणि वृक्षसंगोपण शासकीय आणि जनतेतुन करण्यात येऊ लागले यातुनच वाढदिवसानिमित्त ईतर खर्चाला फाटा देत वृक्षलागवड गावात करण्यात येऊ लागली असून भविष्यात लिंबागणेश हिरवंगार गाव दिसेल यात तिळमात्र शंका नाही.

ग्रांमपंचायत मार्फत बाजारतळावर वृक्षलागवड &वृक्षसंगोपण
______________________________ विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी दिलेल्या आदेशानुसार बीड जिल्हा परीषद अंतर्गत 60 लाख वृक्षलागवड करण्याचे शासनाचे उद्दीष्ट आहे त्या योजनेंतर्गत लिंबागणेशचे सरपंच निकिता स्वप्निल गलधर व भाजपा तालुकाध्यक्ष स्वप्निल गलधर यांच्या मार्गदर्शनात बाजारतळावर वृक्षलागवड करण्यात आली यावेळी विस्तार आधिकारी टेकाळे,ग्रामसेवक मुसळे, उपसरपंच शंकर वाणी, ग्रामपंचायत कर्मचारी जीवन मुळे, सुखदेव वाणी, गणेश थोरात तसेच आरोग्य विभागातील कर्मचारी तसेच महाराष्ट्र ग्रामीण बॅकेचे मॅनेजर जगताप व ताटे आदि उपस्थित होते.

जयदत्त आण्णा क्षीरसागर यांच्या कर्मचा-याने वाढदिवसानिमित्त वृक्षलागवड:-
______________________________ जयदत्त आण्णा क्षीरसागर यांचे पाटोदा येथिल पीव्हीपी काॅलेजमधिल लॅब टेक्निशियन असणारे नवनाथ वाणी यांनी त्यांच्या व जयदत्तजी आण्णा क्षीरसागर यांच्या रोहित मुलाच्या वाढदिवसानिमित्त नविन सिमेंट क्राॅक्रीट रस्ता लिंबागणेश गाव ते गणपती देवस्थान यांच्या दोन्ही बाजुस गुलमोहरांची नेकनुर येथील मकसुद नर्सरी मधुन विकत झाडे घेऊन वार होणारा खर्च गावात झाडे लावण्यासाठी खर्च केला, यावेळी वृक्षलागवड करताना ज्येष्ठ शिवसेना नेते गणेशकाका मोरे, अशोकराजे वाणी, संतोष वाणी औदुंबर नाईकवाडे, आदि उपस्थित होते, ग्रांमपंचायतकडून आणि नवनाथ वाणी यांच्या वाढदिवसानिमित्त होणा-या वृक्षलागवड या दोन्ही कार्यक्रमात मी सहभागी होतो.
एकंदरीतच भविष्यात लिंबागणेश हिरवंगार गाव दिसेल यात शंका नाही.

डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
मो.नं.8180927572

error: Content is protected !!