ब्रेकिंग न्युज
भाजपा व राष्ट्रवादीने वंचित मतदारांना मतदान करण्या पासून रोखले :-अशोक हिंगे यांचा आरोपघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेसध्याच्या तीव्र पाणी टंचाईवर जिल्हाधिकार्‍यांनी तातडीने उपाय योजना करावी – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागरगेवराई तालुक्यातील ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरला डिझेल वाचून वारंवार ब्रेकशेती विकत नसल्याने महिलेचा विनयभंग करून पतीस मारहाण सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकणाऱ्या व्यक्तीवर कारवाई होणारघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेनिघोजे ग्रामपंचायत उपसरपंचपदी इंदिरा फडके बिनविरोध‘सायकल चालवा,हृदयरोग टाळा,पायी चाला हृदय सांभाळा’        आर्वी येथे मंगळवारपासून वार्षिक हरिनाम सप्ताह

गोर- गरिबांच्या घश्यातला गहू, तांदूळ काळ्याबाजारात जातो तरी कसा.

गोर- गरिबांच्या घश्यातला गहू, तांदूळ काळ्याबाजारात जातो तरी कसा.

🔸अशोक काळकुटे | संपादक

▪️सुहास सावंत | माजलगाव.
जिल्हाभर चालू असलेल्या शासकिय धान्य घोटाळा व काळ्या बाजारात जाणाऱ्या गहू , तांदूळ हे काही नवक नाही.
माजलगाव मध्ये बुधवारी पोलिसांनी पकडलेल्या तिनशे क्किंटल गहू , तांदूळ काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणार होता . परंतु तहसीलचे महसूल विभागाच्या वतीने गुन्हा दाखल करायला चलढकल होत होती. अखेर पोलिसांनीच या प्रकरणी दोघांन विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पण खरा चोर सोडून संन्याश्या फासावर चढवण्याची प्रथा काय नविन नाही. या मागलचा मुख्य सुत्रधार बाहेरच मोकाट असल्याची माजलगावमध्ये जोरदारपणे चर्चा चालू आहे.
काळ्या बाजारात माजलगावातून विक्रीसाठी जाणारा रेशनचा गहू , तांदूळाचा 300 क्किंटल धान्याचा टेम्पो बुधवारी पोलिसांनी पकडला, परंतु या धान्या बाबतीत महसूल विभागाने कानावर हात ठेवून हे धान्य ओळखता येत नाही . म्हणून ते धान्य ओळखण्यासाठी व तपासणीसाठी क्रषी विद्यापीठात पाठवावे, असे सांगत गुन्हा दाखल करण्यास बगल दिली होती. तहसील च्या पळकाडू धोरणात्मक कामात धान्य माफिया सोबत मिलीभगत असल्याची चर्चा तालुक्यात होत आहे.

पकडलेल्या त्या धान्याच्या पोत्यावर गोव्हरमेंट आँफ महाराष्ट्र असा उल्लेख देखील तरी हे धान्य काळ्याबाजारात जाते कसे.

पोलिसांनी पकडलेल्या त्या सर्व 610 गोण्या शासकीय असल्याचे उघड असतांना महसूल विभागाने पोलिसां समोर पेच निर्माण करत गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली होती. त्यामुळे पोलिसांनी काळ्या बाजारात धान्य घेऊन जाणाऱ्या इमरान मुस्ताफा खान व आयशरचा टेम्पो चालक ( एम एच-22, ए एन 2175) शेख नसीमुद्दीन या दोघांवर जिवनाश्यक कायद्यानूसार गुन्हा अखेर पोलिसांनी यांच्या वर गुन्हा दाखल केला आहे. पण या दरम्यान दोन छोटे मासे पोलिसांच्या हाती लागले असले तरी राशनचा काळा बाजार करणारा मोठा मासा अजून बाहेरचं आहे. तरी पोलीस प्रशासन त्या बड्या माशांच्या शोधत आहेत. त्याचा लवकरच शोध लावला जाईल असे तपासी अधिकारी पि.आय. धनंजय फराटे यांनी सांगितले आहे.

error: Content is protected !!