ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

*आळंदीकरांची मदत पोहोचली अतिवृष्टी झालेल्या भागात..*

आळंदी नगरीचे नगरसेवक तथा मा. उपनगराध्यक्ष सचिन रामदास गिलबिले व मा. नगरसेवक दिनेश घुले यांच्या मार्गदर्शनाखाली आळंदी शहर व विविध भागातून अतिवृष्टी झालेल्या पूरग्रस्त भागातील गरजू बांधवांच्या मदतीसाठी किराणा व इतर सामान गोळा केले होते. सोमवार दि. ०२ ॲागस्ट २०२१ रोजी सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील अतिवृष्टी झालेल्या मेठतळे, शिरवली, कसरूड व हातलोट या भागातील गरजू नागरिकांना या सर्व किराणा किटचे वाटप केले. याकामी येळे येथील यशवंत ट्रस्टचे अध्यक्ष रवी बोडके व वाई येथील उद्योजक ऋषिकेश भूतकर यांची खूप मोलाची मदत झाली. आळंदी वरुन एवढ्या लांबून ही मदत त्या ठिकाणी मिळाल्यावर नागरिकांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता.
अतिशय भयानक परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी प्रचंड पाऊस सुरु असताना मेठतळे गावचे सरपंच विठ्ठल शिंगरे व पोलीस पाटील मंगेश शिंगरे यांच्या मदतीने मेठतळे येथील मंदीरात सर्व नागरिकांना बोलावून त्या ठिकाणी किराणा किटचे अतिशय चांगल्या पध्दतीने वाटप करण्यात आले. या कामी मोठ्या मनाने आर्थिक व वस्तू स्वरूपात मदत केलेल्या आळंदीकरांचे पूरग्रस्त बांधवांनी आभार मानले.
पूरग्रस्त बांधवांना ही मदत पोहोच करण्यासाठी नगरसेवक सचिन रामदास गिलबिले, मा. नगरसेवक दिनेश घुले, राकेश सिंग, उमेश थोरवे, परेश सुर्यवंशी, सुरज जंगम, सागर बद्दप, संतोष वायाळ, बळीराम खंदारे व अन्य मित्र परिवार उपस्थित होते.

error: Content is protected !!