ब्रेकिंग न्युज
मतदार यादीतून नावे गायब झालेल्यांना मतदानाची संधी द्यावी !स्वाराती रूग्णालयातील मशिन व यंत्रसामुग्री दुरूस्त करून रूग्णांचे हाल थांबवाकार,मोटारसायकल व बैलगाडीच्या तिहेरी अपघातात एक ठार चार जखमीअलंकापुरीत दिव्यांग बांधवांचे ज्ञानेश्वरी पारायण हरिनाम गजरात  अपयशाने खचून न जाता यशाला जिद्द परिश्रमाच्या जोरावर जीवन प्रकाश’माननर्सिंगच्या नवीन अभ्यासक्रमामुळे संधी वाढल्याकुणबी प्रमाणपत्र न मिळाल्याने पालवण येथील मराठा तरुणाची आत्महत्या ..!बिंदुसरा नदीपात्राशेजारील ३०० घरांना महापुराचा धोका ; मान्सुनपुर्व साफसफाईची जिल्हाधिका-यांना मागणी   :- डॉ.गणेश ढवळेआळंदी मंदिरात मोहिनी एकादशी साजरी मंदिरात लक्षवेधी पुष्पसजावट; दर्शनास गर्दीसांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्न

” स्वाभिमानी” च्या आंदोलनाचे सकारात्मक परिणाम. रस्त्यांच्या डांबरीकरण व दुरूस्तीसाठी १२, कोटी ४० लाख रु.चे प्रस्ताव मंजुरीसाठी जिल्हाधिकारी बीड यांचेकडे सादर.

“स्वाभिमानी” च्या आंदोलनाचे सकारात्मक परिणाम
रस्त्यांच्या डांबरीकरण व दुरुस्ती साठी
12 कोटी 40 लाख रु.चे प्रस्ताव मंजुरीसाठी जिल्हाधिकारी बीड यांचेकडे सादर !!

केज/प्रतिनिधी
तालुक्यातील होळ ,बनसारोळा पंचक्रोशीतील सर्वच गावाला जोडणारे मुख्य रस्ते प्रचंड मोठ्या प्रमाणात खड्डे पडून खराब झाले आहेत. गावातील नागरिकांना, वाहनधारकांना, महिलांना, आबालवृद्धांना रस्त्यावरून प्रवास करताना मोठी कसरत करावी लागते.सद्या पावसाळ्यात तर कोणत्याही रस्त्याने जाणे मुश्किल बनले आहे. वारंवार निवेदन ,आंदोलन करून सुद्धा प्रशासन ,स्थानिक स्वराज्य संस्थांचे लोकप्रतिनिधी,आमदार, पालकमंत्री, खासदार , जिल्हा प्रशासन मूग गिळून जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याने अनेक वर्षांपासून जटील बनलेल्या रस्त्याची कायमस्वरूपी समस्या सोडवून घेण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना सोबत घेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे सातत्याने आंदोलनात्मक संघर्ष करत आहेत .स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आतापर्यंत केलेल्या प्रयत्नांना यश येत असल्याचे दिसत असून
दि.27 जुलै 2021 रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांच्या नेतृत्वाखाली अंबाजोगाई-कळंब राज्य महामार्गावर बोरीसावरगाव येथे दीड तास आक्रमक चक्का जाम आंदोलन केले होते
याची सकारात्मक दखल घेत जि.प.बांधकाम विभाग क्र.2 बीड कार्यकारी अभियंता यांनी तालुक्यातील 9 अत्यंत खराब असलेले रस्त्यांचे कायमस्वरूपी डांबरीकरण करण्यासाठी 12 कोटी 40 लाख रु .व तात्पुरती दुरुस्ती साठी 1 कोटी 55 लाख रु ची प्रशासकीय मंजुरी मिळावी म्हणून विहीत प्रपत्र मध्ये जिल्हाधिकारी बीड यांचेकडे प्रस्ताव सादर केले आहेत.
सदर प्रस्तावातील रस्त्यांना तातडीने मंजुरी मिळवून देण्यासाठी केज जि.प.बांधकाम उपविभागीय अभियंता श्री. एस. डी. पवार साहेब ,शाखा अभियंता श्री. सय्यद साहेब
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांनी आज दि.18 ऑगस्ट रोजी प्रस्तावित रस्त्यांची संयुक्त स्थळ पाहणी केली. यावेळी जेष्ठ नेते अशोक साखरे, प्रमोद पांचाळ, चंद्रकात अंबाड,सुग्रीव करपे, शिवाजी भाकरे,अविनाश करपे ,गोविंद करपे,डिगंबर करपे ,जयंत कुलकर्णी, बंडू करपे, आदी गावकरी उपस्थित होते.
——————-/———————— या रस्त्यांना मिळणार प्रशासकीय मंजुऱ्या
*चंदनसावरगाव-जवळबन* *जवळबन-बोरीसावरगाव*
*सावळेश्वर-जवळबन*
*लोखंडीसावरगाव-कानडी बदन*
*बनसारोळा- सौंदाणा*
*बनसारोळा-आवसगाव*
*सावळेश्वर-आवसगाव*
*नायगाव-आवसगाव*
*लाडेगाव-दिपेवडगाव*
*लाडेगाव-जवळबन*
*कानडीबदन-सोमनाथबोरगाव*
*आनंदगाव-सारणी*
*आनंदगाव-भाटुंबा*

–//प्रतिक्रिया—//
होळ,युसुफवडगाव सर्कल मधिल रस्ते गेली 10 वर्षांपासून प्रचंड मोठे खड्डे पडुन खराब झाले असल्याने नागरिकांना ,आबालवृद्धांना दैनंदिन वाहतूक करणे जिकरीचे झाले आहे.
प्रत्यक्ष रस्ता कामे सुरू होईपर्यंत आमचे
आंदोलन चालुच राहील—
श्री. कुलदीप करपे जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना (पक्ष),बीड जिल्हा.

error: Content is protected !!