ब्रेकिंग न्युज
वाढदिवसाचे औचित्य साधत”महावीर के रोटी” उपक्रमांतर्गत अन्नदान १००० कलशधारी सुवासिनी महिलांची प्रभात फेरी ठरणार लक्षवेधीजिल्ह्यात माणुसकी सेवा फाऊंडेशनचा झंझावात…युवकांनी सलोखा , बंधुत्व संबंध जोपासण्याची गरज –  ॲड. सुभाष (भाऊ) राऊतवाढदिवसाचे औचित्य साधत”महावीर के रोटी” उपक्रमांतर्गत अन्नदान स्मशानभूमी अभावी अंत्यसंस्कार करताना वाद ही लाजीरवाणी बाब मात्र लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला सोयरसुतक नाही:- डॉ.गणेश ढवळेसोयाबीन पेरणी पूर्वी उगवण क्षमता तपासा :- कृषी विभागाचे आवाहन.स्नेह-75 च्यावतीने जागतिक कुटूंब दिनानिमित्त शर्मा परिवाराचा सत्कारजामखेड कृषी उत्पन्न बाजारचे सभापती पै. शरद कार्ले यांच्या सभापती पदाची वर्षपुर्ती.घाटशीळ पारगावात व्यापाऱ्याला मारहाण

*”पत्रकार श्रीराम तांदळे यांच्या वरील खोटा गुन्हा तपासा अंती निकाली काढावा- मराठी पत्रकार परिषद, महाराष्ट्र राज्य…..!*

केज!प्रतिनिधि!दि,१६, मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त मा.एस.एम. देशमुख यांच्या नेतृत्वाखाली व मराठी पत्रकार परिषदेचे राज्य प्रसिध्दि प्रमुख मा. अनिलजी महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली
मराठी पत्रकार परिषदेचे उपजिल्हाप्रमुख विजय आरकडे , मा. प्रा. हनुमंत भोसले, जेष्ठ पत्रकार धनंजय कुलकर्णी, झुंजार पत्रकार संघाचे अध्यक्ष, दशरथ चवरे, सचिव. दत्तात्रय हंडिबाग यांच्या उपस्थितीत पत्रकार श्रीराम तांदळे यांच्यावर दाखल केलेला खोटा गुन्हा तपासाअंती निकाली काढावा या मागणीसाठी आज मराठी पत्रकार परिषद, यांच्या वतीने असंख्य पत्रकार बांधवांनी केज पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक, श्री. शंकर वाघमोडे साहेब यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी, मराठी पत्रकार परिषदेचे राज्य प्रसिद्धी प्रमुख मा. श्री.अनिलजी महाजन यांनी सांगितले कि पत्रकारांवर दाखल केलेला खोटा गुन्हा तपासाअंतीमागे घेवून निकाली काढावा व पोलिस प्रशासनाने पत्रकारांना न्याय द्यावा तसेच यापुढे निपक्ष काम करण्यास पोलिस प्रशासनाने पाठबळ द्यावे,
यावेळी पत्रकार अनिल गलांडे, पत्रकार महादेव दळवी, पत्रकार नंदकुमार मोरे, चंद्रकांत पाटिल, पत्रकार मुंडे,रमेश इतापे, रमेश गुळ भिले, वाजेद शेख, गौतम बचुटे, दिनकर राऊत, धनंजय घोळवे, इत्यादी पत्रकार बांधव उपस्थित होते.

error: Content is protected !!