ब्रेकिंग न्युज
जागतिक योग दिनानिमित्त योग महोत्सवआमदार प्रा राम शिंदे यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्कसत्तेची गुरमी आणि गैरवापर कसा केला जातो याच उत्तम उदाहरण म्हणजे मोदी सरकार – शरद पवार पंकजाताई मुंडेंच्या विजयावरशिक्का मोर्तब करा:पप्पू कागदेबुवा जय हरी ! पालखी सोहळ्याचे वेळापत्रक आलं बरं ,लागा तयारीला !शेतीकामांसाठी बैलांची मागणी वाढल्याने भर दुष्काळात बैलबाजारात तेजीआज12 मे जागतिक परिचारिका दिनानिमित्तग्रामदैवत सालशिदबाबा यात्रा उत्सव उद्या दिनांक १२/०५/२०२४ वार रविवार यात्रेचे आयोजनआज कडा येथील उपमुख्यमंत्री अजित पवार व छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या जाहीर सभेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे.-आ. बाळासाहेब आजबे यांचे आवाहनजामखेड येथे महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी

*साई पतसंस्थेच्या वतीने साई सहाय्यता निधीसह किराणा साहित्याचे वाटप*

केज-( प्रतिनिधी)दि.16 सप्टेंबर
तालुक्यातील बनसारोळा येथील साई महिला नागरी पतसंस्थेच्या वतीने साई सहाय्यता निधीसह किराणा साहित्याचे वाटप सहायक पोलिस निरीक्षक विजय आटोळे यांच्या हस्ते करण्यात आले.परिसरातील गोरगरीब नागरिकांना सन 2017 पासून नियमितपणे साई सहाय्यता निधीसह किराणा साहित्याचे वाटप करण्यात येते. ज्यांची आर्थिक परिस्थिती नाजूक व हलाखीची आहे अशांना पतसंस्थेकडून फुल ना फुलांची पाकळी म्हणून सामाजिक बांधिलकी जपत किराणा साहित्याचे वाटप करण्यात येते.अशा प्रकारचा स्तुत्य उपक्रम राबवत साई पतसंस्थेने इतर पतसंस्थापुढे आदर्श निर्माण केला आहे. ग्रामीण भागाशी साई पतसंस्थेची नाळ जोडलेली असल्यामुळे ग्रामीण भागातील लोकांचे सुख दुःख जाणत आशा प्रकारचा उपक्रम साई पतसंस्था राबवत असल्याचे व पुढील वर्षी केज तालुक्यासह अंबाजोगाई तालुक्यासाठीही असा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे संस्थेचे संचालक राजपाल काकडे यांनी बोलताना सांगितले.यावर्षी तालुक्यातील नायगाव,केकत सारणी,बोरीसावरगाव या ठिकाणच्या गरजू नागरिकांना किट चे वाटप करण्यात आले.या वेळी कार्यक्रमासाठी युसुफवडगाव पोलीस स्टेशन चे सहायक पोलिस निरीक्षक विजय आटोळे साई पतसंस्थेचे संचालक राजपाल काकडे,पुरोगामी पत्रकार संघाचे अध्यक्ष डी. एम.मुजमुले दत्तात्रय,बानसरोळा बीट चे जमादार श्री.म्हेत्रे नवनाथ काकडे,अमोल गायकवाड,अनिल गोरे ,नारायण वाघमोडे,सुग्रीव जोगदंड,अफसर पठाण,राजेश लोंढे,प्रदीप पालकर,बाळासाहेब काकडे व संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते …

error: Content is protected !!