ब्रेकिंग न्युज
वाढदिवसाचे औचित्य साधत”महावीर के रोटी” उपक्रमांतर्गत अन्नदान १००० कलशधारी सुवासिनी महिलांची प्रभात फेरी ठरणार लक्षवेधीजिल्ह्यात माणुसकी सेवा फाऊंडेशनचा झंझावात…युवकांनी सलोखा , बंधुत्व संबंध जोपासण्याची गरज –  ॲड. सुभाष (भाऊ) राऊतवाढदिवसाचे औचित्य साधत”महावीर के रोटी” उपक्रमांतर्गत अन्नदान स्मशानभूमी अभावी अंत्यसंस्कार करताना वाद ही लाजीरवाणी बाब मात्र लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला सोयरसुतक नाही:- डॉ.गणेश ढवळेसोयाबीन पेरणी पूर्वी उगवण क्षमता तपासा :- कृषी विभागाचे आवाहन.स्नेह-75 च्यावतीने जागतिक कुटूंब दिनानिमित्त शर्मा परिवाराचा सत्कारजामखेड कृषी उत्पन्न बाजारचे सभापती पै. शरद कार्ले यांच्या सभापती पदाची वर्षपुर्ती.घाटशीळ पारगावात व्यापाऱ्याला मारहाण

*सरस्वती महाविद्यालयात हिंदी दिन साजरा* 

केज दि १७(प्रतिनिधी)
     हिंदी भाषा भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक समन्वयाची भाषा होती. हिंदी भाषेच्या माध्यमातूनच भारताच्या स्वातंत्र्य संग्रामास मोठी शक्ती मिळाल्याचे प्रतिपादन प्राचार्य डॉ गौतम पाटील यांनी केले. ते सरस्वती महाविद्यालय येथे 14 सप्टेंबर हिंदी दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रम प्रसंगी अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
      कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून प्रा डॉ अलका डांगे तर प्रमुख उपस्थिती प्राचार्य हनुमंत सौदागर यांची होती. यावेळी प्रा डॉ डांगे यांनी, हिंदी भाषा याविषयी सविस्तर असे मार्गदर्शन केले. तर प्राचार्य सौदागर यांनी हिंदी भाषेची उपयोगिता आणि आजच्या वर्तमानात तिचे संवर्धन आणि विकास करणे. हे एक आवाहन असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक डॉ लक्ष्मण तोंडाकुर यांनी तर आभार प्रा डॉ जे के जाधव यांनी मानले. यावेळी प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

सोबत फोटो

error: Content is protected !!