ब्रेकिंग न्युज
मतदार यादीतून नावे गायब झालेल्यांना मतदानाची संधी द्यावी !स्वाराती रूग्णालयातील मशिन व यंत्रसामुग्री दुरूस्त करून रूग्णांचे हाल थांबवाकार,मोटारसायकल व बैलगाडीच्या तिहेरी अपघातात एक ठार चार जखमीअलंकापुरीत दिव्यांग बांधवांचे ज्ञानेश्वरी पारायण हरिनाम गजरात  अपयशाने खचून न जाता यशाला जिद्द परिश्रमाच्या जोरावर जीवन प्रकाश’माननर्सिंगच्या नवीन अभ्यासक्रमामुळे संधी वाढल्याकुणबी प्रमाणपत्र न मिळाल्याने पालवण येथील मराठा तरुणाची आत्महत्या ..!बिंदुसरा नदीपात्राशेजारील ३०० घरांना महापुराचा धोका ; मान्सुनपुर्व साफसफाईची जिल्हाधिका-यांना मागणी   :- डॉ.गणेश ढवळेआळंदी मंदिरात मोहिनी एकादशी साजरी मंदिरात लक्षवेधी पुष्पसजावट; दर्शनास गर्दीसांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्न

*ओला दुष्काळ जाहीर करून शेतकर्यांना सरसकट हेक्टरी 50 हजारांची मदत द्या*-VBVP तालुका अध्यक्ष विशाल देशमुख

केज ! प्रतिनिधी

केज तालुक्यात आठवडा भरापासून अतिवृष्टी होत आसून अतिवृष्टीमुळे शेतकर्यांनी घाम गाळून पिकलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.तरी बीड जिल्ह्य़ात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकर्यांना हेक्टरी 50 हजारांची नुकसान भरपाई देण्याची मागणी VBVP केज तालुका अध्यक्ष विशाल देशमुख यांनी केली आहे.

यावर्षी अगोदरच शेतकरी कोरोना लाॅकडाऊणने आडचणीत आला आहे.त्यात आठवडा भरापासून पावसाने कहर केल्याने खरीप हंगामाचे मोठे नुकसान झाले आसून बीड जिल्हा अधिकार्यांनी सबंधित विमा कंपन्यांना आदेश देऊनही विमा कंपन्याकडून शेतकर्यांना अग्रीम विमा भरपाईची रक्कम दिली जात नाही.त्यात पुन्हा आठवडा भरापासून केज तालुक्यातील वरपगावसह जिल्ह्यात पावसाने हाहाकार माजवला आसून सोयाबीन,कापूस,बाजरी,ऊस,कांदा ईत्यादी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.तसेच नद्यांना महापूर आल्याने जमिनी वाहून गेल्या आहेत.तर काही ठीकाणी शेतकऱ्यांचे घरे देखिल कोसळून भुईसपाट झाले आहेत.तसेच काढुन टाकलेले सोयाबीन कुजून गेले आहे.त्यामुळे शेतकर्यांना अशा कठीण काळात राज्य सरकारने शेतकर्यांना तात्काळ सरसकट हेक्टरी 50 हजारांची मदत करण्याची मागणी VBVP केज तालुका अध्यक्ष विशाल देशमुख यांनी केली आहे.

error: Content is protected !!