ब्रेकिंग न्युज
मुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगतासोयाबीन उगवण क्षमता तपासूनच पेरणी करा – गेवराई कृषी विभागाकडून आवाहन.अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात; गावपुढारी बेफिकीर ; जबाबदार सरपंच ,ग्रामसेवकांवर कारवाई करा :- डॉ.गणेश ढवळेमाहिला शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने मुलींना स्वसंरक्षणाचे धडेथोरल्या पादुका मंदिरास भाविका कडून सव्वा लक्ष रूपयांची देणगीमराठा आरक्षणासाठी 32 वर्षांच्या तरुणाने गळफास घेऊन संपविले जीवनभाजपा व राष्ट्रवादीने वंचित मतदारांना मतदान करण्या पासून रोखले :-अशोक हिंगे यांचा आरोप

आर्यन खानला पकडण्यासाठी NCB ने रचला सापळा ?

 

मुंबई | NCB ने दिलेल्या माहिती नुसार ज्यावेळी रेव पार्टी होणार होती. त्यावेळी त्याजागी १२०० ते १३०० तरुण-तरुणी उपस्थित होत. मात्र NCB त्या जमलेल्या लोकांच्या गर्दीत त्यांना मिळालेल्या माहितीनुसार ‘त्या’ ८ ते १० लोकांच्या शोधात होती. त्यामध्ये अभिनेता शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन शाहरूख खानचं नाव देखील अगदी स्पष्ट होतं.

आर्यन खान आणि त्याचा मित्र अरबाज मर्चंटवर खास लक्ष ठेवण्यासाठी NCB चे अधिकारी तैनात होते. कारण या प्रकरणाची माहिती NCB ला अगोदरच मिळाली होती. आर्यन खानच्या नावाने कोणतीच वेगळी अशी रूम बूक नव्हती. मात्र आयोजकाने आर्यन खान आणि अरबाज मर्चंटकरता खास एक रूम आयोजित केली होती. जशी ही दोघं त्या खास कॉम्प्लीमेंट्री रूममध्ये जाऊ लागले तशी NCB छ्या अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर धा़ड टाकली.

ज्यावेळी त्या दोघांचा तपास कऱण्यात आला तेव्हा आर्यन खानकडे काहीच सापडलं नाही. मात्र अरबाज मर्चंटच्या शूजमध्ये चरस सापडलं. NCB ने या दोघांचे मोबाइल ताब्यात घेतले. तेव्हा या दोघांमध्ये चरस घेण्यावरून चॅट झालं होतं. तसेच आर्यन खानने आपल्या स्टेटमेंटमध्ये सांगितलं देखील आहे. NCB शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानसह आणखी तिघांना रविवारी अटक केली आहे. अटक केलेल्या या 8 जणांची पोलीस कोठडी संपणार आहे. त्यामुळे या सर्वना आज कोर्टात हजर करण्यात येणार असून कोर्टाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

error: Content is protected !!