ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

भुजबळ-कांदे वाद सुरु असताना आता राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या आमदारांमध्ये रंगले शाब्दिक युद्ध

 

मंत्री छगन भुजबळ तसेच शिवसेना आमदार सुहास कांदे यांच्यात झालेला भर सभेतील शाब्दिक वाद चांगलाच रंगला होता. तसे कांदे यांनी भुजबळ यांच्यावर केलेल्या आरोपामुळे खळबळ उडाली होती. आता हा वाद संपत नाही तोच शिवसेना तसेच राष्ट्रवादीचे नेते आमनेसामने आले आहेत. आमच्या काळात झालेल्या कामाचे श्रेय घेऊ नका असे म्हणत शिवसेनेचे माजी आमदार योगेश घोलप यांनी राष्ट्रवादीचे आमदार सरोज आहेर यांच्यावर सडकून टीका केली आहे.

शिवसेनेचे माजी आमदार योगेश घोलप यांनी राष्ट्रवादी पक्षाचे विद्यमान आमदार सरोज आहेर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. आमच्या काळात झालेल्या कामांचे श्रेय घेऊ नका असे माजी आमदार योगेश घोलप सरोज आहेर यांना उद्देशून म्हणाले आहेत. देवळाली मतदारसंघातील विकासकामाच्या संदर्भाने त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

नाशिक जिल्ह्यातील देवळाली या मतदारसंघात काही विकासकामांच्या उद्घाटनाचा समारंभ पार पडला होता. या कार्यक्रमाला जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि तसेच नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन सरोज आहेर यांनी केले होते. याच उद्घाटन कार्यक्रमानंतर योगेश घोलप आक्रमक झाले आहेत. त्यांनी हे काम माझ्या कारकिर्दीत झाले आहे, असा दावा केला. तसेच कामांचे श्रेय घेण्याचे आहेर यांनी थांबवावे अशी खोचक टिप्पणी घोलप यांनी केली आहे

error: Content is protected !!