ब्रेकिंग न्युज
गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगतासोयाबीन उगवण क्षमता तपासूनच पेरणी करा – गेवराई कृषी विभागाकडून आवाहन.अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात; गावपुढारी बेफिकीर ; जबाबदार सरपंच ,ग्रामसेवकांवर कारवाई करा :- डॉ.गणेश ढवळेमाहिला शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने मुलींना स्वसंरक्षणाचे धडेथोरल्या पादुका मंदिरास भाविका कडून सव्वा लक्ष रूपयांची देणगी

माझ्या जावयाकडे गांजा सापडला नाही, ती तंबाखू होती. एनसीबी’ला फरक समजतो की नाही

 

मुंबई | सध्या एनसीबी आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्यात जोरदार शीतयुद्ध सुरु झाले आहे. त्यापूर्वी मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखडे यांच्यावर अनेक गंभीर आरोप लावले आहे. यावर आता जावयावर केलेल्या कारवाईवर मलिक म्हणाले माझ्या जावयाकडे गांजा सापडलाच नाही. जावयाच्या घरातून जे जप्त करण्यात आलं ते हर्बल तंबाखू होतं. हा माझा दावा नाही तर कोर्टाच्या ऑर्डरमध्ये तसं म्हटलं आहे. त्यामुळे एनसीबीला हर्बल तंबाखू आणि गांजा यातील फरक कळतो की नाही?’ असा सवाल विचारत मंत्री नवाब मलिक यांनीएनसीबीवर गंबीर आरोप केले आहेत.

एनसीबीकडून केल्या जाणाऱ्या कारवाया या बनावट आहेत. या संपूर्ण प्रकरणात माझ्या जावयाला नाहक अडकवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. असं म्हणत नवाब मलिक यांनी एनसीबीच्या कारवाईबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. मलिक यांचे जावई समीर खान यांना अखेर जामीन मंजूर झाला आहे. यावेळी कोर्टाने जामीन अर्ज मंजूर करताना असं म्हटलं होतं की, समीर खान यांच्याबाबत ड्रग्ज सिंडिकेटचा कोणताही पुरावा आढळलेला नाही. याच मुद्द्यावर नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन एनसीबीच्या एकूण कार्यशैलीवर टीका केली आहे.

‘छापेमारीत माझ्या जावयाकडे २०० किलो गांजा सापडला असा आरोप एनसीबीने लावला होता. पण साडेसात ग्राम गांजा हा फर्निचरवालाकडे मिळाला. बाकी सर्व गोष्टी या हर्बल टोबॅको होत्या. हे मी नाही म्हणत. तर कोर्टाच्या रिपोर्टमध्ये म्हटलेलं आहे. त्यामुळे एनसीबीला तंबाखू आणि गांजामधला फरक कळत नाही याचं आश्चर्य वाटतं. खरं तर एनसीबी सारख्या संस्थांकडे अंमली पदार्थ आहेत की नाही हे तपासण्यासाठी एक विशिष्ट किट असतं. त्याचा वापर त्यांना छापेमारीत करता येतो’ असं म्हणत नवाब मलिकांनी एनसीबीच्या कारवाईवर काही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

error: Content is protected !!