ब्रेकिंग न्युज
गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगतासोयाबीन उगवण क्षमता तपासूनच पेरणी करा – गेवराई कृषी विभागाकडून आवाहन.अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात; गावपुढारी बेफिकीर ; जबाबदार सरपंच ,ग्रामसेवकांवर कारवाई करा :- डॉ.गणेश ढवळेमाहिला शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने मुलींना स्वसंरक्षणाचे धडेथोरल्या पादुका मंदिरास भाविका कडून सव्वा लक्ष रूपयांची देणगी

राज्य सरकारकडून माफिया राज चालविण्याचे काम; पंकजा मुंडेंची घणाघाती टीका

 

राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यसून विरोधक सतत महाविकास आघाडी सरकारवर टीका करताना दिसून येत आहे. त्यातच आता भाजपा नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी सुद्धा राज्य सरकारवर घणाघाती टीका केली आहे. ‘राष्ट्रवादीची प्रतिमा काय आहे, दहशत काय आहे, हे शरद पवारांनी देखील पाहिले पाहिजे. सत्ताधारी माफिया राज चालवित आहेत, सत्ता प्रस्थापित होऊन दोन वर्षे होत आले असल्याची टीका मुंडेंनी केली आहे.

बीड येथे एका कार्यक्रमात भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी उपस्स्थिती लावली. यावेळी त्या म्हणाल्या की, बीड जिल्ह्याची संस्कृती चांगली करण्यासाठी आम्हाला खूप वेळ लागला होता. पालकमंत्री मुंडेंनी जिल्ह्याची संस्कृती बिघडवू नये. माझा कार्यकर्ता तुम्हाला घाबरणार नाही. माझा कार्यकर्ता लाचार नाही. मुंडे साहेब दुबईच्या गुन्हेगाराला घाबरले नाही, त्या मुंडे साहेबांचे रक्त आमच्या अंगात आहे. दसऱ्याच्या आधी सरकारकडून मदत मिळाली पाहिजे, शेतकऱ्यांची दिवाळी गोड करा, असा इशारा मुंडेंनी दिला.

तसेच त्या पुढे म्हणाल्या की, सरकारच्या विरुद्ध आंदोलन करणे हे आमचे विरोधी पक्ष म्हणून दायित्व आहे. राष्ट्रवादीची प्रतिमा काय आहे, दहशत काय आहे, हे शरद पवारांनी देखील पाहिले पाहिजे. चुकीच्या माणसाला पाठीशी घालणे हेदेखील चुकीचे आहे. यांना आता घरी बसविले पाहिजे, असा इशारा पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांना दिला.

error: Content is protected !!