ब्रेकिंग न्युज
भाजपा व राष्ट्रवादीने वंचित मतदारांना मतदान करण्या पासून रोखले :-अशोक हिंगे यांचा आरोपघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेसध्याच्या तीव्र पाणी टंचाईवर जिल्हाधिकार्‍यांनी तातडीने उपाय योजना करावी – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागरगेवराई तालुक्यातील ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरला डिझेल वाचून वारंवार ब्रेकशेती विकत नसल्याने महिलेचा विनयभंग करून पतीस मारहाण सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकणाऱ्या व्यक्तीवर कारवाई होणारघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेनिघोजे ग्रामपंचायत उपसरपंचपदी इंदिरा फडके बिनविरोध‘सायकल चालवा,हृदयरोग टाळा,पायी चाला हृदय सांभाळा’        आर्वी येथे मंगळवारपासून वार्षिक हरिनाम सप्ताह

*केज पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक श्री शंकर वाघमोडे यांचे जनतेला शांतता राखण्याचे आवाहन.*

केज / प्रतिनिधी

केज पोलीस स्टेशन कडून नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की,
देशातील व महाराष्ट्रातील काही भागात घडलेल्या अप्रिय घटनांच्या अनुषंगाने धार्मिक भावना भडकावणाऱ्या काही आक्षेपार्ह पोस्ट, खोट्या बातम्या/अफवा प्रसारित करणारे ऑडिओ/व्हिडिओ व संदेश सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.अशा प्रकारच्या पोस्ट ऑडिओ/ व्हिडिओ फॉरवर्ड करू नये अशा आक्षेपार्ह पोस्ट प्राप्त झाल्यास संबंधित सुजाण नागरिकांनी इतर कोणत्याही अफवा न पसरवता तात्काळ संबंधित माध्यमावर खात्री करावी तसेच सत्यता पडताळणी करावी.व संबंधित नजीकच्या पोलीस स्टेशनला संपर्क साधावा.तसेच सामाजिक शांतता भंग करणारे, समाजविघातक व्हिडीओ, पोस्ट, संदेश, सोशल मीडियावर व्हायरल करणे गुन्हा आहे. अशा प्रकारच्या पोस्ट व्हिडिओ वर लक्ष ठेवण्याबाबत फेसबूक ,इंस्टाग्राम ,ट्विटर, व्हाट्सअप, इत्यादी सर्व सार्वजनिक माध्यमांना कळविण्यात आले आहे सोशल मीडिया व इंटरनेटच्या माध्यमातून
पोस्ट करताना सामाजिक भान ठेवत माहिती तंत्रज्ञान अधिनियम २०००(आयटी अॕक्ट २०००) मधील तरतुदी चे कायदेशीरपणे पालन करावे. वाॕट्सअप वापरणारे ग्रुप मध्ये असणारे सर्व सदस्य विशेष हे ग्रुप ऍडमिनशी समन्वय साधून ग्रुपमध्ये अशा प्रकारचे पोस्ट किंवा व्हिडिओ प्रसारित होणार नाहीत याची विशेष दक्षता घेणे बाबत योग्य त्या उपाय योजना आखव्यात. तसेच सदर बाबत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.
पोलीस स्टेशन केज यांचेकडून सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की,अशा प्रकारचे धार्मिक भावना भडकविनारे व खोट्या बातम्या प्रसारित करणारे व्हिडिओ किंवा पोस्ट प्रसारित करू नये.तसेच अशाप्रकारचे आक्षेपार्ह व्हिडिओ,पोस्ट करताना कोणीही आढळून आल्यास त्याची माहिती त्वरित नजीकच्या पोलिस स्टेशनला देण्यात यावी. असे आवाहन
केज पोलीस स्टेशन
शंकर श्रीराम वाघमोडे
सहा.पोलीस निरीक्षक
प्रभारी अधिकारी पो.स्टे केज मोबाईल क्रमांक ८८०१६४६४६४ ,
मा.पोलीस अधीक्षक कार्यालय पो.नियंत्रण कक्ष बीड.फोन क्रमांक ०२४४२-२२२३३३, ०२४४२- २२२६६६ या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.

error: Content is protected !!