ब्रेकिंग न्युज
गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगतासोयाबीन उगवण क्षमता तपासूनच पेरणी करा – गेवराई कृषी विभागाकडून आवाहन.अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात; गावपुढारी बेफिकीर ; जबाबदार सरपंच ,ग्रामसेवकांवर कारवाई करा :- डॉ.गणेश ढवळेमाहिला शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने मुलींना स्वसंरक्षणाचे धडेथोरल्या पादुका मंदिरास भाविका कडून सव्वा लक्ष रूपयांची देणगी

भाजपच्या या खासदाराला जीवे मारण्याची दहशतवादी संघटनेची धमकी!

 

नवी दिल्ली | टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू आणि भारतीय जनता पक्षाचे खासदार गौतम गंभीरला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. ISIS काश्मीर या दहशतवादी संघटनेनं ही धमकी दिली आहे.या प्रकरणात गंभीरनं दिल्ली पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. गंभीरच्या या तक्रारीनंतर त्याच्या घराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

खासदार गौतम गंभीरनं मंगळवारी रात्री ही तक्रार दाखल केली आहे. दिल्ली पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आल्याची माहिती डीसीपी सेंट्रल श्वेता त्रिपाठी यांनी दिली आहे.ISIS काश्मीर या दहशतवादी संघटनेनं ईमेल आणि फोनच्या माध्यमातून जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार गंभीरनं केली आहे. सध्या खासदार गंभीर यांच्या घराजवळील सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार २००७ साली झालेला T20 वर्ल्ड कप आणि २०११ साली झालेल्या वन-डे वर्ल्ड कपमधील विजयात गंभीरची मोठी भूमिका होती. या दोन्ही वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये त्यानं टीम इंडियाकडून सर्वात जास्त रन केले होते. गंभीरनं २०१९ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपामध्ये प्रवेश केला. सध्या तो पूर्व दिल्लीचा भाजपा खासदार आहे.

error: Content is protected !!