ब्रेकिंग न्युज
वाढदिवसाचे औचित्य साधत”महावीर के रोटी” उपक्रमांतर्गत अन्नदान स्मशानभूमी अभावी अंत्यसंस्कार करताना वाद ही लाजीरवाणी बाब मात्र लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला सोयरसुतक नाही:- डॉ.गणेश ढवळेसोयाबीन पेरणी पूर्वी उगवण क्षमता तपासा :- कृषी विभागाचे आवाहन.स्नेह-75 च्यावतीने जागतिक कुटूंब दिनानिमित्त शर्मा परिवाराचा सत्कारजामखेड कृषी उत्पन्न बाजारचे सभापती पै. शरद कार्ले यांच्या सभापती पदाची वर्षपुर्ती.घाटशीळ पारगावात व्यापाऱ्याला मारहाणटँकरने पाणी पुरवठाबाबत अडचणी आल्यास संपर्क क्रमांकावर तक्रार करावीजातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवजामखेड येथे मधूरजल प्युअर वाॅटर चे उद्घाटन संपन्नरणविर काका पंडीत यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

भंडारकवठे जिल्हा परिषद गटाची निवडणुक चुरशीने होणार… भंडारकवठे गट सर्वसाधारण झाल्यास भाजपाकडून यतीन शहा यांना उमेद्वारी मिळण्याची शक्यता

सोलापूर संपादक – महेश पवार

प्रतिनिधी – बबलू अडोळे

 

आगामी होणा-या भंडारकवठे जिल्हा परिषद गटाची निवडणुक हि अंत्यत चुरशीने होणार असल्याचे बोलले जात आहे.या गटातून भाजपाकडून तालुका सरचिटणीस यतीन शहा,काँग्रेसकडून सुरेश हसापुरे,शिवसेनेकडून अमर पाटील,राष्ट्रवादी कडुन संजय पुजारी,असे अनेक दिग्गजांची नावे चर्चेत आहेत.अनेक दिग्गज भंडारकवठे गटात इच्छुक असल्याने हि निवडणूक चुरशीने होणार हे निश्चित आहे. भाजपाकडुन तालुका सरचिटणीस यतीन शहा हे यांचा मतदारसंघात दांडगा जनसंपर्क असुन ते ही निवडणूक डोळ्यासमोर ठेवून गेल्या एक वर्षांपासून या मतदारसंघातील नागरिकांशी संपर्कात आहे. याशिवाय मतदारसंघातील नागरिकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी यामध्ये पोलिस स्टेशन,तहसील कार्यालय. महावितरण कार्यालय,जी सर्व सामान्य नागरिकांची कामे ज्या कार्यालयाशी निगडीत असतात ते सोडवण्यासाठी प्रामुख्याने सोडवण्यासाठी प्रयत्न करताना दिसुन येतात.याशिवाय ते अनेकांना दावाखना असो किंवा इतर कुठलेही कारण असो त्यांना यतीन शहा यांनी मदत केली आहे.गेल्या काही दिवसांत लंवगी येथील चार अल्पवयीन मुलांचा नदीच्या पात्रात बुडुन मृत्यु झाला त्यांची घरची परिस्थिती अंत्यत गरीबीची होती.त्याना तात्काळ आर्थिक मदत करून धीर दिला.असे अनेक उदाहरण यतीन शहा यांच्याबाबतीत देता येतील. आणि ते आमदार सुभाष देशमुख यांचे विश्वासु सहकारी आहेत अनेक वर्षांपासून ते सुभाष देशमुख यांच्या बरोबर एकनिष्ठ आहेत.
काँग्रेस कडुन सुरेश हसापुरे यांच्या नावाची जोरदार चर्चा असुन त्यांनी या अगोदर या मतदार संघाचे प्रतिनिधित्व केलेले आहे.त्यांनाही माननारा मोठा वर्ग या मतदारसंघात आहे. शिवसेनेकडून हत्तुर येथील जिल्हा परिषद सदस्य अमर पाटील यांचे नाव चर्चेत असुन यंदाच्या निवडणुकीत हत्तुर मतदारसं हा महिला होणार असा अंदाज असल्याने अमर पाटील यांचे नाव या मतदारसंघातून चर्चेत आहे.त्यांचे वडील रतिकांत पाटील हे दक्षिण तालुक्याचे प्रतिनिधित्व केले आहे त्यांनाही माननारा मोठा वर्ग या मतदारसंघात आहे.राष्ट्रवादीकडुन तेलगाव येथील संजय पुजारी यांचे नाव चर्चेत असुन ते नवखे असले तरी त्यांनी या मतदार संघात मतदारांना आकर्षित करण्यासाठी अनेक समाजोपयोगी कामात झोकून घेतले आहे.ते सुध्दा या गटात तरूनासाठी क्रीकेट स्पर्धा अनेक कार्यक्रम घेऊन या निवडणुकीत त्यांच्या उमेदवारी बाबतीत चर्चेत आहेत. याकरीता अनेक दिग्गजांची नावे या मतदारसंघातून चर्चेत असल्याने,संपूर्ण तालुक्याचे लक्ष या मतदारसंघाकडे आहे यातच अत्ता येणारा काळच ठरवेल की या मतदारसंघातून कोण निवडुन येणार…

error: Content is protected !!