ब्रेकिंग न्युज
वाढदिवसाचे औचित्य साधत”महावीर के रोटी” उपक्रमांतर्गत अन्नदान स्मशानभूमी अभावी अंत्यसंस्कार करताना वाद ही लाजीरवाणी बाब मात्र लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला सोयरसुतक नाही:- डॉ.गणेश ढवळेसोयाबीन पेरणी पूर्वी उगवण क्षमता तपासा :- कृषी विभागाचे आवाहन.स्नेह-75 च्यावतीने जागतिक कुटूंब दिनानिमित्त शर्मा परिवाराचा सत्कारजामखेड कृषी उत्पन्न बाजारचे सभापती पै. शरद कार्ले यांच्या सभापती पदाची वर्षपुर्ती.घाटशीळ पारगावात व्यापाऱ्याला मारहाणटँकरने पाणी पुरवठाबाबत अडचणी आल्यास संपर्क क्रमांकावर तक्रार करावीजातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवजामखेड येथे मधूरजल प्युअर वाॅटर चे उद्घाटन संपन्नरणविर काका पंडीत यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

मंद्रुप जिल्हा परिषद गटातून युवा पत्रकार महमद शेख उतरणार राजकीय आखाड्यात . . .

सोलापूर संपादक महेश पवार

प्रतिनिधी- बबलु अडोळे

दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप जिल्हा परिषद गट व गण असलेल्या भागातून मंद्रुप येथील उच्चशिक्षित तरुण व पत्रकार महमद शेख यंदा पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुक लढवणार असल्याची चर्चा तालुक्यात रंगत आहे.

महमद शेख हे एक उच्चशिक्षित असून सर्वसामान्य परिस्थिती असणारे असून त्यांची संघर्ष करण्याची क्षमता व आत्मविश्वासाचा आवाका मोठा आहे.मागील पाच वर्षांपासून ते शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या विविध प्रश्नांशी तत्कालीन भाजप सरकारच्या विरोधात आंदोलनाच्या माध्यमातून आवाज उठवला आहे.२४ मे २०१७ रोजी शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काळे झेंडे दाखवले.आपया लेखणीच्या माध्यमातून वेळोवेळी समाजातील विविध विषयांवर आपले रोखठोक मत मांडणारे व मंद्रुपच्या समस्या घेवून ग्रामपंचायत प्रशासनाला काम करण्यासाठी भाग पाडणारा एक सच्चा समाजसेवक म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे.
२०१७ च्या ग्रामपंचायत निवडणुकीत मंद्रुपमध्ये तिसऱ्या पँनलची स्थापना करण्यात महमद शेख यांचाही खूप मोठा वाटा होता. एक इमानदार व स्वच्छ प्रतिमा असणारे शेख हे पत्रकारितेच्या माध्यमातून मंद्रुपमधील अनेक प्रलंबित प्रश्नांना मार्गी लावण्याचे काम केले आहे. मंद्रुप जि.प.गटातून एक उच्चशिक्षित व अभ्यासू व्यक्तीमत्व असणारे तळागाळातील व्यक्तींसाठी झटणारे महमद शेख यांनाच काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळावी अशी इच्छा जि.प.गटातील तरुण व शेतकरी बांधवामध्ये आहे. भारतरत्न मौलाना आझाद सामाजिक संघटना मंद्रुप चे उपाध्यक्ष ही आहेत.

error: Content is protected !!