ब्रेकिंग न्युज
लोकशाहीचा उत्सव साजरा होत असतानाच पिंपरनई गावावर शोककळा; विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने विवाहितेचा मृत्यू:- डॉ.गणेश ढवळेसीमा सिंग यांनी आयोजित केला कार्यक्रम  ‘इनस्पायरिंग मदर्स ‘मेघश्रेय फाउंडेशनतर्फे विविध महिलांचा करण्यात आला गौरवलिंबागणेश सर्कल मध्ये  तुतारीच वाजणार ; सर्वसामान्य मतदार बजरंग बाप्पाच्या पाठीशी लिंबागणेश येथील फेव्हीस्टीक प्रकरणामुळे संवेदनशील मतदान केंद्राचा आयजी विरेंद् मिश्रा,एसपी नंदकुमार ठाकूर  यांच्याकडून आढावा जागतिक योग दिनानिमित्त योग महोत्सवआमदार प्रा राम शिंदे यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्कसत्तेची गुरमी आणि गैरवापर कसा केला जातो याच उत्तम उदाहरण म्हणजे मोदी सरकार – शरद पवार पंकजाताई मुंडेंच्या विजयावरशिक्का मोर्तब करा:पप्पू कागदेबुवा जय हरी ! पालखी सोहळ्याचे वेळापत्रक आलं बरं ,लागा तयारीला !शेतीकामांसाठी बैलांची मागणी वाढल्याने भर दुष्काळात बैलबाजारात तेजी

माजी सैनिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटीबद्ध : आ.देशमुख हुतात्मा स्मृती मंदिरात माजी सैनिकांचा राज्यस्तरीय मेळावा संपन्न

सोलापूर संपादक – महेश पवार

प्रतिनिधी – संतोष विभुते

स्वतःचा जीव धोक्यात आहे, याची जाणीव असून देखील केवळ देशाची सेवा करायची आहे, या उदात्त हेतूने प्राणाची, कुटुंबाची पर्वा न करता सैनिक सारे आयुष्य वेचतात. निवृत्तीनंतर मात्र, या माजी सैनिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागतेय, तेव्हा माजी सैनिकांचे जे काही प्रश्न आहेत, ते लोकप्रतिनिधी या नात्याने राज्य व केंद्र सरकारकडून सोडविण्यासाठी कटीबद्ध असल्याची ग्वाही आमदार सुभाष देशमुख यांनी दिली.
भारतीय माजी सैनिक संघटनेच्या सोलापूर जिल्हा शाखेने रविवारी हुतात्मा स्मृती मंदिरात राज्य स्तरीय माजी सैनिक मेळावा, सोलापूर जिल्ह्यातील वीर माता, वीर पत्नी, वीर पिता, कारगील युद्धातील योद्धे यांचा सन्मान व माजी सैनिकांच्या पाल्यांचा गौरव समारंभ आयोजित केला होता. त्यावेळी अध्यक्षस्थानावरुन आ.देशमुख बोलत होते. पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरु डॅा.मृणालिनी फडणवीस, भारतीय माजी सैनिक संघटनेचे राज्य अध्यक्ष गोपाल वानखेडे, जनरल सेक्रेटरी एम.जी. बिल्लेवार, सकल मराठा समाज संघटनेचे जिल्हा अध्यक्ष माऊली पवार, आय.एम.पी. ग्रीन गृहनिर्माण प्रकल्पाचे संजीव पटेल, जिल्हाध्यक्ष अरुणकुमार तळीखेडे, सेक्रेटरी दिलावर शेख, उपाध्यक्ष मारुती मोरे, राजकुमार जमखंडी, विठाबाई हेडे, शोभा बारलल्लू, उस्मानाबादचे जिल्हाध्यक्ष शहाजी चालुक्य, पुणे जिल्हाध्यक्ष यशवंत महाडिक, रामदास मदने, रघुनाथ सावंत,विश्वेश्वर सोनवणे (मुंबई),विष्णु डोंगरे (अकोला), सय्यद मीर (हिंगोली), जी.एम.स्वामी (लातूर), वीर पिता मुन्नागीर गोसावी,व्यंकट पोतदार यांच्यासह माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मी माजी सैनिकांच्या दर्शनासाठी आलोय, असे सांगून आ.देशमुख म्हणाले, माजी सैनिकांच्या ज्या मागण्या आहेत, त्या त्यांच्या मागण्या नसून तो त्यांचा हक्क आहे. आणि सरकारने हा हक्क माजी सैनिकांना देणे गरजेचे आहे. केंद्र व राज्य सरकारकडून प्रेमाने आपण मागण्या मान्य करुन घेऊ. त्यासाठी मी सदैव तयार आहे. प्रत्येक तालुक्यात संघटना मजबूत करा. मला बोलवा. माझा लोकमंगल परिवारही मदतीसाठी तत्पर राहील. राज्य अध्यक्ष वानखेडे म्हणाले, राज्यात 20 लाख माजी सैनिक असून अनेक प्रश्न त्यांचे प्रलंबित आहेत. राज्यात संघटना मजबूत करुन माजी सैनिकांच्या समस्या सोडविण्यासाठी सर्वांनी आता एकत्रित येण्याची गरज आहे. बिल्लेवार म्हणाले, आजही कित्येक माजी सैनिक व त्यांचे वारस सुधारित पेन्शनपासून वंचित आहेत. प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा शाखांनी सैनिकांच्या प्रश्नांसंबंधी आदालत आयोजित करावी आम्ही राज्याचे पदाधिकारी त्या-त्या जिल्ह्याच्या ठिकाणी तळ ठोकून प्रश्न निकाली काढू. जिल्हाध्यक्ष तळीखेडे म्हणाले, आम्ही सैनिकांनी सारे आयुष्य देशासाठी समर्पित करायचे. सेवानिवृत्त झाल्यानंतर आम्हाला शासन दरबारी सन्मानाची वागणूक मिळत नाही. सैनिकांचा हक्काचा लोकप्रतिनिधी असावा,यासाठी ग्रामपंचायत, महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्था, विधान परिषद व राज्यसभेत माजी सैनिकांसाठी जागा राखीव ठेवाव्यात. पत्रकार दत्ता मोकाशी यांनी सूत्रसंचालन केले.

माजी सैनिकांच्या मेळाव्याकरिता खासदार, महापौर, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त यांना आमंत्रित केले होते. मात्र सर्वांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरविली. त्यामुळे माजी सैनिकांमधून नाराजीचा सूर उमटला होता.
वीरमाता, वीर पत्नी यांना भाऊबीज भेट म्हणून जिल्हाध्यक्ष अरुणकुमार तळीखेडे यांनी स्व:खर्चाने साडीचोळी दिली.
भारतीय माजी सैनिक संघटनेच्या राज्य शाखेकडून सोलापूर जिल्हा शाखेला मेळाव्यासाठी मदत म्हणून 25 हजार रुपयांचा धनादेश राज्य अध्यक्ष गोपाल वानखेडे, बिल्लेवार यांनी जिल्हाध्यक्ष तळीखेडे यांच्याकडे सुफुर्द केला.

error: Content is protected !!