ब्रेकिंग न्युज
श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगतासोयाबीन उगवण क्षमता तपासूनच पेरणी करा – गेवराई कृषी विभागाकडून आवाहन.अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात; गावपुढारी बेफिकीर ; जबाबदार सरपंच ,ग्रामसेवकांवर कारवाई करा :- डॉ.गणेश ढवळेमाहिला शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने मुलींना स्वसंरक्षणाचे धडेथोरल्या पादुका मंदिरास भाविका कडून सव्वा लक्ष रूपयांची देणगीमराठा आरक्षणासाठी 32 वर्षांच्या तरुणाने गळफास घेऊन संपविले जीवनभाजपा व राष्ट्रवादीने वंचित मतदारांना मतदान करण्या पासून रोखले :-अशोक हिंगे यांचा आरोपघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेसध्याच्या तीव्र पाणी टंचाईवर जिल्हाधिकार्‍यांनी तातडीने उपाय योजना करावी – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर

दिल्लीतून धक्कादायक बातमी : कफ सीरपचा १६ मुलांवर साइड इफेक्ट; तीन चिमुकल्यांचा मृत्यू

दिल्लीतून धक्कादायक बातमी : कफ सीरपचा १६ मुलांवर साइड इफेक्ट; तीन चिमुकल्यांचा मृत्यू

नवी दिल्ली (प्रतिनिधी):- दिल्ली सरकारद्वारे चालवण्यात येणाऱ्या मोहल्ला क्लिनिकमधून देण्यात आलेलं कफ सीरप सेवन केल्याने १६ चिमुकल्यांना साइड इफेक्ट झाला असून त्यातील ३ मुलांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. चार वर्षांखालील मुलांना डेक्स्ट्रोमेथोर्फन हे कफ सीरप देऊ नये अशी स्पष्ट सूचना असतानाही हे सीरप दिले गेल्याने हा प्रकार घडल्याचेही स्पष्ट झाले असून याप्रकरणाची गंभीर दखल घेत तीन डॉक्टरांवर कठोर कारवाई करण्यात आली आहे. त्यांना तत्काळ सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेवरून राजकारण सुरू झाले असून भाजपने आम आदमी पक्षावर ढिसाळ कारभाराचा आरोप केला आहे.

दिल्ली सरकारच्या वतीने अनेक भागांत मोहल्ला क्लिनिक चालवण्यात येत असून या क्लिनिकमधून लिहून देण्यात आलेलं सीरप घेतल्यानंतर एकूण १६ लहान मुलांवर साइड इफेक्ट झाला. या सर्व मुलांना कलावती सरन बाल रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यातील तीन मुलांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य सेवा महासंचालकांनी याची गंभीर दखल घेत तातडीने दिल्ली सरकारला महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. डेक्स्ट्रोमेथोर्फन हे कफ सीरप सेवन केल्यानंतर हा त्रास झाल्याचे निर्दर्शनास आले असून त्याआधारावर हे सीरप चार वर्षांखालील मुलांसाठी प्रीस्क्राइब न करण्याचे स्पष्ट निर्देश सर्व मोहल्ला क्लिनिकना देण्यात यावेत असे आरोग्य सेवा महासंचालकांनी दिल्ली सरकारला सांगितले आहे. याशिवाय याबाबत ड्रग कंट्रोलर यांनाही सूचना देण्यात आली आहे. कफ सीरपच्या साइड इफेक्टने तीन मुले दगावल्याचे समोर आल्यानंतर दिल्ली सरकार हादरलं आहे. याप्रकरणी सरकारकडून कठोर पावले उचलण्यात आली आहेत. याबाबत आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी माहिती दिली. ते म्हणाले, याप्रकरणी तीन डॉक्टरांना टर्मिनेट करण्यात आले आहे. त्याचवेळी या प्रकरणाची चौकशी डीएमसीकडे देण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले.

दरम्यान, भाजपने दिल्लीतील अरविंद केजरीवाल सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. दिल्ली भाजप अध्यक्ष आदेश गुप्ता यांनी मुलांच्या आयुष्याशी का खेळत आहात, असा खरमरीत सवाल केला आहे. जे सीरप चार वर्षांखालील मुलांना द्यायचेच नाही ते औषध मोहल्ला क्लिनिकमधील डॉक्टरांनी दिले आहे. त्यामुळे जी मुले दगावली आहेत त्याला जबाबदार कोण याचे उत्तर सरकारने द्यायला हवे, असेही गुप्ता यांनी नमूद केले.

error: Content is protected !!