ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

गिरणी कामगारांचे कुटुंब उपोषणावर – चिमणीवरील कामगार रुग्णालयात – फिनले मिल आंदोनल चिघळले

 

 

निकेश विंचुरकर चांदुर बाजार तालुका प्रतिनिधि;

अचलपुर- गेल्या 3 दिवसापासून वेगवेगळ्या पदधतीने सुरू असलेल्या फिनले मिल कामगारांच्या आंदोलनाच्या तिसर्‍या दिवशी कामगारांच्या कुटुंबातील सदस्यांनी उपोषण सुरू केले आहे. आता हे आंदोलन चिघळण्याच्या मार्गावर आले आहे. 

फिनले मिल कामगारांच्या विविध मागण्यांसाठी कामगार नेते अभय माथने यांच्या नेतृत्वात तीन दिवसापासून आंदोलन सुरू झाले आहे. पहिल्या दिवशी काही कामगार 70 फुट उंच चिमणीवर चढले व अन्य कामगारांनी निदर्शने केली. दुसर्‍या दिवशीही चिमणीवर चढलेले कामगार तेथेच होते. तर उर्वरीत कर्मचार्‍यांनी चक्काजाम आंदोलन केले. बुधवार तिसर्‍या दिवशी चिमणीवर चढलेल्या कामगारांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. आंदोलनाची तीव्रता कमी होऊ नये म्हणून आता गिरणी कामगारांच्या परिवारातील महिला व मुले आणि अन्य सदस्यांनी उपोषण सुरू केले आहे.

 त्यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे फिनले मिल प्रशासन चांगलेच घाबरले आहे. दुसरीकडे जिल्हातील राजकीय नेत्यांनी मात्र सदर आंदोलनाला प्रत्यक्ष भेट वा पाठींबा न दिल्याने कामगारांमध्ये नेत्यांविरोधात संतापाची भावना आहे. गेल्या तीन दिवसापासून सुरु असलेले आंदोलन चिघळण्याच्या मार्गावर आहे. चिमनी आंदोलन, रास्तारोको आणि आज कामगारांच्या परिवारातील लहान मुले, महिलांनी उपोषण सुरू केले. जो पर्यंत मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्यााचा निर्धार कामगारांनी व्यक्त केला.

error: Content is protected !!