ब्रेकिंग न्युज
श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगतासोयाबीन उगवण क्षमता तपासूनच पेरणी करा – गेवराई कृषी विभागाकडून आवाहन.अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात; गावपुढारी बेफिकीर ; जबाबदार सरपंच ,ग्रामसेवकांवर कारवाई करा :- डॉ.गणेश ढवळेमाहिला शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने मुलींना स्वसंरक्षणाचे धडेथोरल्या पादुका मंदिरास भाविका कडून सव्वा लक्ष रूपयांची देणगीमराठा आरक्षणासाठी 32 वर्षांच्या तरुणाने गळफास घेऊन संपविले जीवनभाजपा व राष्ट्रवादीने वंचित मतदारांना मतदान करण्या पासून रोखले :-अशोक हिंगे यांचा आरोपघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेसध्याच्या तीव्र पाणी टंचाईवर जिल्हाधिकार्‍यांनी तातडीने उपाय योजना करावी – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर

चिंता वाढली :कोरोनाची तिसरी लाट ३ महिने चालणार

धनंजय कुलकर्णी-उपसंपादक ,दै. सूर्योदयमहाराष्ट्र

चिंता वाढली :कोरोनाची तिसरी लाट ३ महिने चालणार

नवी दिल्ली (प्रतिनिधी):- देशात  कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत प्रथमच नवीन रुग्णांची संख्या ही १.६ लाखांच्या पुढे गेली आहे. त्याच वेळी अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ५ लाख ८४ हजारांवर गेली आहे. दरम्यान, देशातील कोरोना रुग्णांची संख्या लवकरच शिगेला पोहोचू शकते. तसंच सध्याची लाट ज्या वेगाने येतेय, तितक्याच वेगाने ती ओसरण्याची शक्यताही तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

अलिकडे ज्या भागात कोरोनाची रुग्णांची संख्या वाढली आहे, तिथे ३ महिन्यांत रुग्णांची संख्या कमी होऊ लागेल. देशात ५० टक्क्यापेक्षा जास्त ओमिक्रॉनचे रुग्ण हे फक्त मोठ्या शहरांमध्ये आढळत आहेत, असे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे (ICMR) अतिरिक्त संचालक डॉ. समीरन पांडा यांनी शनिवारी सांगितले.

तिसऱ्या लाटेत हॉस्पिटलायझेशन दर कमी

कोरोनाच्या राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गटाचे (NTAGI) अध्यक्ष डॉ. एन. च्या. अरोरा यांनीही करोनाची तिसरी लाट शिगेला कधी पोहोचेल? याची माहिती दिली आहे. ओमिक्रॉनचा जागतिक डेटा आणि गेल्या ५ आठवड्यांतील आपला अनुभव पाहता बहुतेक ओमिक्रॉनचा संसर्ग हा सौम्य आणि लक्षणे नसलेले असतात, असे डॉ. अरोरा म्हणाले.

रुग्णालयात दाखल करण्यात आलेले रुग्ण हे गंभीर आजार असलेले आहेत किंवा त्यांचे वय ६० वर्षांपेक्षा जास्त आहे. Omicron मुळे हॉस्पिटलायझेशन दर फक्त १ ते २ टक्के आहे. डेल्टा वेरियंटच्या दुसऱ्या लाटेच्या तुलनेत हॉस्पिटलायझेशन हा दर खूपच कमी आहे, असे डॉ. अरोरा म्हणाले.

९१ टक्के प्रौढांना लसीचा किमान एकच डोस

देशातील ८० टक्क्यांहून अधिक लोकसंख्येला व्हायरसचा संसर्ग झाला आहे. ९१ टक्क्यांपेक्षा अधिक प्रौढांनी लसीचा एक डोस घेतला आहे आणि १८ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सुमारे ६६ टक्के नागरिकांना दोन्ही डोस मिळाले आहेत. अशा स्थितीत तिसऱ्या लाटेचा प्रभाव फार काळ टिकणार नाही, असे डॉ. अरोरा म्हणाले.

गेल्या २४ तासांत देशात कोरोनाचे १.५९ लाखांहून अधिक नवीन रुग्ण आढळून आले आहेत. सुमारे ५ लाख नवीन रुग्ण एकाचवेळी आढळून आले, तर तिसरी लाट आल्याचे संकेत आहे, असे डॉ. अरोरा यांनी सांगितले. ओमिक्रॉनच्या रुग्णांची संख्या वाढेल, तशी कोरोना रुग्णांमध्ये घट होईल, असेही डॉ. अरोरा यांनी स्पष्ट केले आहे.

error: Content is protected !!