ब्रेकिंग न्युज
लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगतासोयाबीन उगवण क्षमता तपासूनच पेरणी करा – गेवराई कृषी विभागाकडून आवाहन.अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात; गावपुढारी बेफिकीर ; जबाबदार सरपंच ,ग्रामसेवकांवर कारवाई करा :- डॉ.गणेश ढवळे

राज्यातल्या शाळा लवकरच सुरू होणार? शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड नंतर आदित्य ठाकरेंनीही दिले संकेत

धनंजय कुलकर्णी-उपसंपादक,महाराष्ट्र दै.सूर्योदय

राज्यातल्या शाळा लवकरच सुरू होणार? शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड नंतर आदित्य ठाकरेंनीही दिले संकेत

मुंबई (प्रतिनिधी):-कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यातील शाळा १५ फेब्रुवारीपर्यंत बंद करण्यात आल्या आहेत. मात्र शाळा सुरू करण्याबात वेगवेगळे मतप्रवाह होते. राज्यातील शाळा सुरु करण्याचा प्रस्ताव शिक्षण विभागाने मुख्यमंत्र्यांकडे दिला आहे. राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनीही शाळा सुरू करण्याबाबत भाष्य केलं होतं. आता शाळा सुरु करण्याबाबत आदित्य ठाकरेंनीही शाळा सुरू करण्याचे संकेत दिले आहे.

आदित्य ठाकरे यांनी ट्वीट करत याविषयी माहिती दिली आहे. आज मुंबई महापालिका आणि कोविड टास्क फोर्ससोबत आदित्य ठाकरेंची बैठक पार पडली. या बैठकीत १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण आणि राज्यातल्या करोना रुग्णसंख्येचा आढावा घेण्यात आला. आपल्या ट्वीटमध्ये आदित्य ठाकरे म्हणतात, मुंबई महानगरपालिका आणि राज्य कोविड टास्क फोर्सच्या तज्ज्ञांसोबत आज आढावा बैठक झाली. आता कोरोना रुग्णसंख्येत सातत्याने घट होत असल्याने आम्ही या बैठकीत आम्ही राज्यातल्या १५ ते १८ वर्षे वयोगटातल्या मुलांचं लसीकरण आणि शैक्षणिक संस्था पुन्हा खुल्या करणं कितपत सुरक्षित आहे, याचा आढावा घेतला.

error: Content is protected !!